4PM Youtube Channel प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला आदेश; कारणांसह खुलासा…
गेल्या काही दिवसांपासून 4PM News या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉकिंगची चर्चा आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडत हे चॅनल ब्लॉक केलं, मात्र चॅनल चालवणारे संजय शर्मा यांना याची नोटीस मिळाली नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून, न्यायालयाने केंद्र सरकारला खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संजय शर्मा यांनी घटनात्मक अधिकारांचा उल्लेख करत यूट्यूब चॅनल ब्लॉकिंगला विरोध केला आहे.