“अतिरेकी म्हणाले, मोदींना जाऊन सांग, आता मोदींनी…”, हिमांशी नरवाल यांचं मोठं विधान
भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांनी लष्कराचे आभार मानले. पहलगाम हल्ल्यात विनय नरवाल यांची हत्या झाली होती. हिमांशी यांनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिल्याबद्दल मोदी सरकारचे आणि सैन्याचे आभार मानले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे नाव दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि दहशतवाद संपवण्याची विनंती केली.