राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका, “बाळासाहेब म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस..”
विधानसभा निवडणूक जवळ आली असून २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा सामना रंगणार आहे. मनसेनेही उमेदवार उतरवले आहेत. राज ठाकरे जोरदार प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते शिवसेनेची काँग्रेस होतना दिसली तर दुकान बंद करेन. आज त्यांचे चिरंजीव हाताच्या पंजाचा प्रचार करत आहेत. ही बाब दुर्दैवी आहे असंही राज ठाकरे म्हणाले.