महायुतीत मंत्रिपदाचं समीकरण काय? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात ४३ जणांचा समावेश होऊ शकतो. कोणाला मंत्रीपदे द्यायची याबाबत तिन्ही नेत्यांनी ठरवलं आहे. अनुभवी आणि नवीन लोकांचं मिश्रण असणार आहे. शिंदे गटातही इच्छुकांची संख्या जास्त असून सर्वांचे समाधान करण्याची तारेवरची कसरत आहे.