जालन्यातल्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर, घोषणाबाजीनंतर तणावपूर्ण शांतता
जालन्यातल्या वडीगोद्री येथे मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा नेते मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. दोन्ही समाजाच्या आंदोलकांनी घोषणाबाजी केली, ज्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली असूनही त्यांनी उपोषण मागे घेतलेले नाही. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी गॅझेट दाखवत मराठे क्षत्रिय असल्याचे सांगितले आहे.