वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवरायांच्या चितेत उडी घेतली ही कथा सत्य- संभाजी भिडे
संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे, कारण ती कपोलकल्पित आहे आणि ऐतिहासिक आधार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सरकारला ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी वाघ्या कुत्र्याची कथा सत्य असल्याचे सांगून समाधीचे समर्थन केले आहे. संभाजीराजेंची भूमिका चुकीची असल्याचंही संभाजी भिडेंनी म्हटलं आहे.