लग्नाच्या वाढदिवशी प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा, ४१ वर्षीय ज्वाला गुट्टाने दिला मुलीला जन्म
भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आई झाली आहे. ४१ वर्षीय ज्वालाने व तिचा पती अभिनेता-निर्माता विष्णू विशाल यांनी एका गोंडस लेकीचे स्वागत केले आहे. विष्णूने आपल्या एक्स अकाउंटवर नवजात मुलीच्या हाताचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दिवशी ही गुड न्यूज मिळाली. चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी या जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.