scorecardresearch

मराठा आरक्षण

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
clash between 2 maratha groups
छ. संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण; नेमकं प्रकरण काय?

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला…

sakal maratha samaj, Nashik and Dindori Seats, lok sabha 2024, meeting, preparation, testing, candidate, reservation, maharashtra politics, marathi news,
नाशिक : सकल मराठा समाजाकडून लोकसभेसाठी चाचपणी

मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार सकल मराठा समाजाची पंचवटीतील संभाजीनगर रस्त्यावरील शेवंता लॉन्स येथे बैठक पार पडली. यावेळी नाशिक, दिंडोरी लोकसभा…

pankaja munde manoj jarange
“मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

पंकजा मुडे म्हणाल्या, काळे झेंडे दाखवणाऱे लोक फार नव्हते. चार-पाच जणच तिथे होते. त्यांच्याकडे काळे झेंडेदेखील नव्हते. त्यांनी खिशातून रुमाल…

manoj jarange shinde fadnavis
“मला राजकारणात हलक्यात घेऊ नका, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज भरणार होते. परंतु, ते अडचणीचं झालं…

solapur, manoj jarange patil marathi news, manoj jarange patil rally marathi news
मनोज जरांगेंचा प्रभाव ओसरू लागला ? करमाळ्यात सभेला अल्प प्रतिसाद; भाषणही पाच मिनिटांत आटोपले

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची सभा करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाण येथे झाली. परंतु, या सभेला अपेक्षित जनसमुदाय हजर…

Maratha vote bank
विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील? प्रीमियम स्टोरी

जरांगे यांच्या आंदोलनाने हिंगोली, बीड, धाराशिव व नांदेड मतदारसंघातही मराठा ध्रुवीकरणाचे मतपेढीत रुपातंर होईल या भीतीने राजकीय नेते मंडळीमध्ये अस्वस्थता…

solapur manoj jarange patil, manoj jarange patil marathi news, maratha reservation latest news in marathi
“आंतरवलीच्या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नावर महत्वाची भूमिका ठरणार”, मनोज जरांगे यांची माहिती

ही बैठक मराठा आरक्षण आंदोलन पुढे नेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

Solapur Lok Sabha
मराठा आंदोलनाच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निश्चित झाला नसताना दुसरीकडे काँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासून आमदार प्रणिती शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघात गावभेटीच्या…

bjp against the maratha agitators says praniti shinde
मराठा आंदोलकांच्या विरोधामागे भाजप – प्रणिती शिंदे; आरोप सिद्ध न केल्यास आंदोलनाचा भाजपचा इशारा

आमदार प्रणिती शिंदे या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या प्रचारासाठी मतदारसंघातील विविध तालुक्यांत  फिरत आहेत.

Manoj Jarange on Devendra Fadnavis over sit prob
“माझ्या क्लिप व्हायरल करून मला तडीपार…”, मनोज जरांगेंचा फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप

माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange made a alligations on Devendra Fadnavis
Manoj Jarange on Devendra Fadnavis: “माझ्यावर गुन्हे दाखल करून…” मनोज जरांगेंचा फडणवीसांवर आरोप

बीड जिल्ह्यात माझ्या विरोधात दहा-पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचं असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे…

संबंधित बातम्या