scorecardresearch

एमपीएससी

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
Dr.Suvarna Kharat transferred MPSC Secretary post Saurabh Katiyar given additional charge
MPSC : ‘एमपीएससी’च्या सचिवपदाची धुरा उत्तर प्रदेशचे टॉपर सौरभ कटियार यांच्याकडे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांची बदली करण्यात आली. त्यानंतर या पदाची धुरा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार…

Mega block on Sunday in Mumbai section of Central Railway
रविवारी परीक्षार्थीचे होणार मेगाहाल; परीक्षेच्या दिवशी मध्य रेल्वेवर मेगाब्लाॅक

या परीक्षाना बसणाऱ्यांना लोकलच्या रविवारच्या वेळापत्रकाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असून रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक…

MPSC Secretary Dr Suvarna Kharat transferred
‘एमपीएससी’च्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांची तडकाफडकी बदली फ्रीमियम स्टोरी

अचानक बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासन आदेशानुसार डॉ. खरात यांची कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या…

MPSC candidates found guilty of malpractices will be permanently banned from the exam
‘एमपीएससी’ची परीक्षा देण्याचे स्वप्न भंगणार!; आयोगाने केली ‘ही’ कठोर कारवाई, तुम्हीही जर…

परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांची संख्या वाढतच झालेल्या यामुळे एमपीएससीने आता कठोर पावले उचलली असून गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना कायम परीक्षा बंदीची शिक्षा…

MPSC Mantra Maharashtra Civil Services Gazetted Prelims Exam Environment
एमपीएससी मंत्र: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा (पेपर एक); पर्यावरण

राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेतील पर्यावरण घटकावर यापूर्वी विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण पाहून त्या आधारे…

MPSC PSI Mains Exam Result Announced
MPSC PSI Result: ‘एमपीएससी’च्या पीएसआय मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, शारीरिक चाचणीसाठी हा आहे कट ऑफ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर…

एमपीएससी मंत्र: राज्य नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा – पेपर एक ; राज्यव्यवस्था आणि प्रशासन

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन – पेपर एक मधील राज्यव्यवस्था आणि प्रशासन या घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये…

MPSC
केरळच्या धर्तीवर ‘एमपीएससी’मार्फत सरळसेवा भरती; MPSC च्या सदस्यांची केरळ लोकसेवा आयोगाला भेट फ्रीमियम स्टोरी

सरळसेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्या अशी अनेक वर्षांपासूनची विद्यार्थी संघटनांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य…

What is the impact of increasing the MPSC cut off on students print exp
MPSC: ‘एमपीएससी’चा ‘कट ऑफ’ वाढल्याने विद्यार्थ्यांवर काय परिणाम? प्रीमियम स्टोरी

दरवर्षी दहा ते पंधरा गुणांनी ‘कट ऑफ’ वाढत आहे. मुख्य परीक्षेमध्ये एकेक गुणही फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे गुणांची टक्केवारी वाढत…

mpsc mains exam result announced
MPSC Mains Exam Cut off EWS: स्‍पर्धा परीक्षार्थ्यांचा कोणता अंदाज खरा ठरला? ‘ईडब्ल्यूएस’चा कट ऑफ कमी लागल्याने…

येत्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातील उमेदवारांना सुगीचे दिवस येतील.

mpsc
‘बहुजन कल्याण’मधील संचालकपद परीक्षेत पात्र उमेदवारांना मुलाखतीची प्रतीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील इतर मागास कल्याण संचालनालयांतर्गत घेण्यात आलेल्या सहायक संचालक, संशोधन अधिकारी व प्रकल्प अधिकारी…

MPSC state services exam 2024 result declared candidates shortlisted for interviews cutoff hits record
MPSC Result : एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर : १५१६ उमेदवार मुलाखतीला पात्र; वाढलेला कट ऑफ पाहून…

MPSC State Services Exam 2024 Result : आजपर्यंतचा सर्वाधिक कट ऑफ या परीक्षेत लागल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला आहे.

संबंधित बातम्या