Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

एमपीएससी Videos

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
Pooja Khedkars mother Manorama Khedkar was arrested by Pune police
Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांच्या आईच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी घेतलं ताब्यात

IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी…

IAS Pooja Khedkar make alligation against media
IAS Pooja Khedkar: “मिडिया ट्रायलद्वारे मला दोषी…”; IAS पूजा खेडकरांचा माध्यमांवर आरोप

प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.पूजा खेडकर यांनी नुकताच माध्यमांवर आरोप केला आहे.…

MPSC Topper Pooja Vanjari: राज्यात MPSC मुलींमध्ये पूजा वंजारी अव्वल, सांगितलं यशामागचं कारण
MPSC Topper Pooja Vanjari: राज्यात MPSC मुलींमध्ये पूजा वंजारी अव्वल, सांगितलं यशामागचं कारण

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये पिंपरी-चिंचवडची पूजा वंजारी ही अव्वल आली आहे. संसार आणि अभ्यास अशी कसरत करून तिने हे…