scorecardresearch

नाशिक

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
nashik education body meeting violence nitin thackeray
मविप्र सभा उधळण्यासाठी बंदुकीव्दारे दहशत; ॲड. नितीन ठाकरे यांची पोलिसांकडे तक्रार…

नाशिक येथील मविप्र संस्थेच्या सभेत विद्यापीठाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि एका व्यक्तीने कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण केल्याने पोलिसांत तक्रार…

Nashik Criminals Expelled
सराईत ११ गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार…

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील पंचवटी आणि भद्रकाली परिसरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

sharad pawar in deola for orphan support
शरद पवार म्हणाले, आम्ही तुमच्याबरोबर… नाशिक जिल्ह्यातील कोणाची स्तुती ?

अनाथ मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक करत शरद पवार म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

nashik to nasa student journey
सुपर ५० उपक्रमातील सहा विद्यार्थ्यांना नासाला भेट देण्याची संधी…

जिल्हा परिषदेच्या ‘सुपर ५०’ योजनेतील सहा विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा आणि इतर संशोधन संस्था पाहण्याची अनोखी संधी मिळाली आहे.

fuel theft exposed from tanker in manmad
टँकरमधून वारंवार इंधन चोरी; नियमित तपासणी न झाल्यास पंपचालकांचा आंदोलनाचा इशारा…

टँकरमध्ये गुप्त पाईपद्वारे होणारी इंधन चोरी ही पेट्रोल पंपांची मोठी डोकेदुखी बनली असून, डिलर्सनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

gold chain snatching case inside house in nashik ramwadi
Nashik Crime: भर दिवसा घरात शिरले चोर; नाशिकमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

Nashik Crime: शहरातील रस्ते, इमारत, घराबाहेरील प्रांगणात, कधी दुचाकीवर मार्गक्रमण करताना घडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेण्याच्या घटना आता थेट…

Sharad Pawar criticizes government over increase in farmer suicides
Sharad Pawar: शेतकरी आक्रोशाकडे दुर्लक्षामुळे आत्महत्यांमध्ये वाढ; शरद पवार यांची सरकारवर टीका, नाशिकमध्ये मोर्चा

महाराष्ट्रातील शेतकरी अस्वस्थ आहे. संकटातून मार्ग काढणे ही राज्य आणि केंद्राची जबाबदारी असते. शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत.

Anonymous mail claiming to have planted a bomb at a Cambridge school Nashik
School Bomb Threat: केंब्रिज शाळेत बाॅम्ब ठेवल्याचा निनावी मेल; तपासणीनंतर सुरक्षिततेचा पोलिसांकडून निर्वाळा

मध्यरात्री शाळेला एक इ मेल प्राप्त झाला होता. या मेलनुसार शाळेचे शौचालय तसेच आवारात तीन बॉम्ब ठेवले असून लवकरात लवकर…

Sharad Pawar along with Supriya Sule and party state president Shashikant Shinde guided the meeting
कृषिविषयक प्रश्नांवरुन नेत्यांची सरकारवर झोड – कर्जमाफीसाठी महिनाभराची मुदत

शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ईदगाह मैदानापासून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

Tribal instruments including trumpets accompany the protest march in Nashik
गळ्यात कांद्यांच्या माळा, टोपल्यांमध्ये शेतमाल; आक्रोश मोर्चाला तुतारीसह आदिवासी वाद्यांची साथ

शहरातील ईदगाह मैदानापासून मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी खा. सुप्रिया सुळे या बैलगाडीवर चढल्या.

munia bird occupy weaver bird nest
सुगरणीच्या आयत्या खोप्यात मुनियांचा घरोबा; मुक्त विद्यापीठ परिसरातील निरीक्षण

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यश सेंटर फॉर बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन समितीतर्फे सुरु असलेल्या पक्षी…

Arrangements for Kumbh Mela at Nashik Road Railway Station; Crowd management work approved
Nashik Kumbh Mela: नाशिकरोड रेल्वे स्थानकात कुंभमेळ्यासाठी व्यवस्था; गर्दी व्यवस्थापन कामांना मंजुरी

फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय…

संबंधित बातम्या