scorecardresearch

नाशिक

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
Arrest looms over Hire father-son duo; Court denies bail
हिरे पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाचा जामिनास नकार

२५ शिक्षकांची व्यंकटेश बँकेत बोगस कर्ज प्रकरणे करून ही रक्कम परस्पर लाटण्यात आल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल आहे.

NIMA office bearers appeal Nitin Gadkari
समृद्धी महामार्ग संपल्यावर भिवंडीजवळील चौफुलीवर कोंडीचे दुखणे; निमा पदाधिकाऱ्यांचे नितीन गडकरींना साकडे

आठपदरी समृद्धी महामार्गावरून भरधाव येणारे वाहनधारक चारपदरी मुंबई-आग्रा महामार्गावर आमणे येथे पोहोचल्यावर कोंडीत अडकतात. कारण, महामार्गावरील आणि समृद्धी महामार्गावरील वाहने…

Nashik accident on narrow road claims college student life
वडाळा रस्त्यावरील अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू – मध्यवस्थीतील अवजड वाहतुकीचा बळी

शाळा सुरू असतांना तसेच सुटतांना या ठिकाणी विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, पालकांची वाहने यासह इतर वाहनांमुळे कायम वाहतूक कोंडी होते.

Withdrawal of complaints clears path for Sunil Bagul and mama Rajwade BJP entry
सुनील बागूल, मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशासाठी तक्रार माघारीच्या पायघड्या

लवकरच आपण राजवाडे आणि समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दुजोरा बागूल यांनी दिला आहे.

Cm Devendra Fadnavis promises to develop Salher into a world class tourist destination
साल्हेरला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ करणार – देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांनी साल्हेरसह बागलाण तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

case raised against farmer in Nashik Sanjay Raut give a letter to devendra fadanvis
Sanjay Raut to Devendra Fadnavis: नाशिकमधील शेतकऱ्याविरोधात खोटा गुन्हा, राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या नाशिकच्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री…

Seema Hire drew attention in the legislature to the lack of attention being paid to solving problems in industrial estates
नाशिक औद्योगिक वसाहतीतील समस्या विधिमंडळात – सीमा हिरे यांचा सभागृहात प्रश्न

अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील शेकडो कंपन्यांमध्ये शहरातील लाखो कामगार कार्यरत आहेत. परंतु, काही वर्षांपासून महानगरपालिकेकडून एमआयडीसीतील समस्या सोडविल्या जात नसल्याने…

Mahalakshmi idol conservation successfully done by mitti foundation in satana nashik
सटाण्यातील ऐतिहासीक मंदिरातील मूर्तीचे शास्त्रशुध्द संवर्धन – मिट्टी फाउंडेशनचा पुढाकार

ही मूर्ती इ.स. १५९० मध्ये बागलाणातील मुल्हेर गडावरील बागूलराजे नारायण शहा राठोड यांनी झंझ राजा यांच्याकडून आणून प्रतिष्ठापना केली होती.

संबंधित बातम्या