scorecardresearch

राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
BJP Strategy of BMC Election : भाजपासमोर कोणकोणती आव्हानं? ठाकरे बंधू एकत्र आल्यास कुणाला फटका? अमित साटम काय म्हणाले? प्रीमियम स्टोरी

Amit Satam Mumbai BJP President Interview : मुंबई महापालिकेत भाजपासमोर कोणकोणती आव्हानं, ठाकरे बंधूंची युती झाल्यास कुणाला बसणार सर्वाधिक फटका,…

Sanjay Mishra on Raj Thackeray
“राज ठाकरेंनी भेटायला बोलावलं आणि म्हणाले, आता हिंदीत…”, संजय मिश्रा यांनी सांगितला किस्सा

Sanjay Mishra on Raj Thackeray : संजय मिश्रा म्हणाले, “अभिजीत पानसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित असल्याचं त्यांनी मला नंतर…

raj thackeray advises focus on voter list ambernath
राज ठाकरेंनी दिला मोलाचा सल्ला; आत्तापासूनच मतदार याद्यांवर काम सुरू करा…

राहुल गांधींच्या आरोपांनंतर राज ठाकरे यांनीही बोगस मतदारांचा मुद्दा उचलून धरत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.

raj-thackarey
पक्षफुटीनंतर राज ठाकरे आज या शहरात अंबरनाथसह, कल्याण डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

पक्षातील फुटीनंतर शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अंबरनाथमध्ये येणार आहेत. गेल्या महिन्यात अंबरनाथ शहरातील शहर अध्यक्षांसह माजी…

Raj Thackeray Post About Historian Gajanan Mehendale
राज ठाकरेंची इतिहासकार गजानन मेहेंदळेंच्या निधनानंतर पोस्ट, “अशी माणसं….”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इतिहासकार गजानन मेहेंदळे यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी जागवणारी पोस्ट लिहिली आहे.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य; “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर मविआ….” फ्रीमियम स्टोरी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होईल अशा चर्चा आहेत. त्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी उत्तर दिलं…

Devendra Fadnavis On Meenatai Thackeray Statue
Devendra Fadnavis : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “या घटनेला राजकीय…”

या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील (छायाचित्र सोशल मीडिया)
Top Political News : भुजबळांना खटल्याचा फटका, मराठे दिल्लीत धडकणार आणि मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरील रंगफेक… दिवसभरात काय घडलं?

Todays Top Political News : मंत्री छगन भुजबळ यांच्या बेनामी मालमत्तेशी संबंधित खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने…

Who is Meenatai Thackeray
9 Photos
Who is Meenatai Thackeray: मीनाताई ठाकरे कोण आहेत? त्यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर दोन्ही शिवसेना, मनसेमध्ये संतापाचे वातावरण का?

Who is Meenatai Thackeray: मुंबईतील दादर येथे असलेल्या शिवाजी पार्कजवळ असलेले दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राजकारण तापले…

Raj Thackeray News
Raj Thackeray : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला, राज ठाकरे घटनास्थळी, उद्धव ठाकरेही येणार?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा दादर येथील शिवाजी पार्क भागात आहे. या पुतळ्यावर लाल रंग…

What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : “पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांचं…”; राज ठाकरेंची प्रबोधनकारांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहिली आहे.

Raj Thackeray share cartoon on Pahalgam Attack india pakistan Asia cup Cricket Match marathi news
Raj Thackeray : भारत-पाकिस्तान सामन्यात नेमकं कोण जिंकलं? राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून सवाल!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यासंबंधी एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे.

संबंधित बातम्या