scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
सरनाईक यांच्या ‘त्या’ रत्नजडीत घड्याळ्याच्या भेटीची राजन विचारे यांच्याकडून आठवण म्हणाले, कोण होतास तू….काय झालास तू…

माजी खासदार राजन विचारे यांनी सरनाईक यांच्यावर टीका केली. तसेच त्यांना काय होतास तू.. काय झालास तू.. असे म्हणत एक…

Uddhav Thackeray response BJP
आम्ही एकत्र आल्यामुळे भाजप नेत्यांच्या बुडाला आग लागली; रुदाली वाटणारे विकृत, उद्धव ठाकरे यांची टीका

मराठी माणसांचे आनंदी क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, तर अशी माणसे अत्यंत विकृत व हिणकस वृत्तीची आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री…

ubt Shiv Sena chief Uddhav Thackeray
विरोधी पक्षनेते पदासाठी सभागृहात आवाज उठवा; उद्धव ठाकरे यांचा आमदारांना आदेश

विधानसभा अध्यक्षांकडे पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आता हा प्रश्न सभागृहात मांडा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (छायाचित्र पीटीआय)
Maharashtra Politics : ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काँग्रेसची दुहेरी कोंडी? पक्षातील नेत्यांना कोणती खंत?

Maharashtra Political News : महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याचे निमंत्रण पाठवले होते. मात्र, काँग्रेसचा एकही नेता…

After Raj-Uddhav's meeting, the Chief Justice Bhushan Gavai made a big statement about Marathi
राज-उद्धव यांच्या सभेनंतर सरन्यायाधीशांचे मराठीबाबत मोठे विधान, म्हणाले, ‘मराठी भाषा…’

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत याविरोधात सभा घेतली आणि मराठीचा आवाज बुलंद केला. या सभेनंतर…

MLA Sanjay Gaikwad apologizes for his remarks
शिंदेंच्या आमदाराचा यू-टर्ण, म्हणाले “तर मी माझे शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो”

मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले होते.

uddhav thackeray devendra fadnavis
Uddhav Thackeray News: “भाजपा मेलाय”, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, “ऊर बडवायला…”

Uddhav Thackeray Targets Devendra Fadnavis: ‘रुदाली’ विधानावरून उद्धव ठाकरेंनी विधानभवनाबाहेर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

Balasaheb Thackeray News
Balasaheb Thackeray : “महाराष्ट्रात आम्ही मराठी पण..”; हिंदी-मराठी भाषेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

BJP MP Nishikant Dubey criticized Raj Thackeray over Marathi bhasha and thackeray brothers Vijayi Melava
“आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, हिंमत असेल तर…”, भाजपा खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचलं

BJP MP Reacts On Raj Thackeray Marathi Vijayi Melava: मीरारोड इथे एका व्यापाऱ्याला मराठी न बोलण्यावरून मारहाण झाल्याच्या प्रकरणी मनसेच्या…

Jalgaon ex mla suresh jain
राज ठाकरे यांच्या मुंबई मेळाव्यातील वक्तव्यामुळे जळगावचे सुरेश जैन पुन्हा चर्चेत फ्रीमियम स्टोरी

विधानसभेवर सलग नऊ वेळा निवडून गेलेले जळगावचे माजी आमदार सुरेश जैन हे १९९९ मध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते.

Revenue Minister Chandrashekhar Bawankule talking to the media in Nagpur
मराठींचं रक्षण करतो, पण परप्रांतीयांवर हल्ले योग्य नाहीत – बावनकुळे

परप्रांतीय माणसांना मारहाण ठीक नाही. ते महाराष्ट्रात कितीतरी वर्षापासून राहतात, ज्यांचा जन्म येथे झाला आहे. त्यांना टार्गेट करणे योग्य नाही.…

संबंधित बातम्या