scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Offer
Uddhav Thackeray: ‘सत्ताधारी बाकावर या’ मुख्यमंत्री फडणवीसांच्या या ऑफरवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Offer: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरेंनाच सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली.…

CM Devendra Fadnavis to Uddhav Thackeray
CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis to Uddhav Thackeray: पुढील पाच वर्ष म्हणजे २०२९ पर्यंत तरी आम्ही विरोधात जात नाही आहोत, पण तुम्हाला…

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंचा सवाल; “अंबादास दानवेंसारख्या कार्यकर्त्यासाठी मी भाजपाचे आभार मानतो, पण तुम्ही….”

Uddhav Thackeray on Ambadas Danve : उद्धव ठाकरे म्हणाले, “अंबादास दानवे हे त्यांचा या सभागृहातील पहिला कार्यकाळ पूर्ण करत आहेत.…

Raj Thackeray : राज ठाकरे म्हणतात, “मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी घातले”, उद्धव ठाकरेंशी युतीच्या दाव्यांवर दिलं स्पष्टीकरण!

Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर युती करण्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे,

Shiv Sena MLA Dispute In Vidhan Sabha Shambhuraj Desai Angry
9 Photos
Shambhuraj Desai Angry : “आमची लाज काढू नका”, मंत्री शंभूराज देसाई भडकले; ठाकरे-शिंदेंच्या नेत्यांमध्ये खडाजंगी, काय घडलं?

Shiv Sena MLA Dispute In Vidhan Sabha : ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांमध्ये सभागृहात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

Raj Thackeray Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ठाकरे युतीमुळे पालटेल का निवडणुकीचा खेळ? दोघांची कुंडली काय सांगते; वाचा ज्योतिषांचा अंदाज फ्रीमियम स्टोरी

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance Prediction : मेळाव्यातील ठाकरे बंधूंच्या एकजुटीनंतर आता आगामी काळात महापालिका निवडणुकीत पुन्हा ही युती प्रत्यक्ष…

Uddhav Thackeray On Raj Thackeray
Uddhav Thackeray : “आता राज ठाकरेही बरोबर आलेत”, उद्धव ठाकरेंचं मनसेच्या युतीबाबत मोठं विधान; मुलाखतीचा टीझर लॉन्च

ही मुलाखत १९ आणि २० जुलैला प्रसिद्ध होणार आहे. मात्र, त्याआधी या मुलाखतीचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे.

Mumbai slum rehabilitation defence land dispute Maharashtra assembly shivsena clash on santa cruz redevelopment
9 Photos
Shivsena Hearing : शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर ॲड. असीम सरोदे काय म्हणाले?

Shivsena Hearing : आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. या प्रकरणावरील सुनावणीला आता पुढील तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ विधानावरून पोलीस महासंचालकांकडे तक्रार, कारवाई करण्याची मागणी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलिकडेच मुंबईत केलेल्या एका जाहीर भाषणादरम्यान एका वक्तव्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे.

Sanjay Shirsats viral video Anil Parabs question to the government
Anil Parab on Sanjay Shirsat: संजय शिरसाटांचा तो व्हिडीओ, अनिल परबांचा सरकारला प्रश्न

सरकारने अधिवेशनात नुकतंच जनसुरक्षा विधेयक पारित केलं. मात्र हे विधेयक आणताना राज्यातील मंत्रीच सुरक्षित नाहीत, असा टोला ठाकरे गटाचे आमदार…

Amruta Fadnavis reaction to Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together
राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, “भाऊ- भाऊ भांडतात.. “

राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, “भाऊ- भाऊ भांडतात.. “

 Chief Minister Fadnavis criticizes Uddhav Thackeray without naming him over the Public Safety Bill
जनसुरक्षा विधेयक न वाचताच विरोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका

‘काही लोक’ जनसुरक्षा विधेयकाचे एकही अक्षर न वाचता, त्याविरोधात बोलत आहेत. त्यांनी जर विधेयक वाचले, तर ते कधीच याविरोधात बोलणार…

संबंधित बातम्या