scorecardresearch

आषाढी वारी २०२५

वारी (Wari) पुंडलिकाला भेटण्यासाठी साक्षात श्रीकृष्ण पंढरपूरला आले. तेव्हा आई-वडिलांची सेवा करतोय, बाहेरच थांब असं पुंडलिकाने साक्षात श्रीहरी यांना सांगितले आणि बाजूला असलेली वीट घराबाहेर फेकली. त्या विटेवर श्रीकृष्ण उभे राहत त्यांनी पांडुरंग, विठ्ठलाचे रुप घेतले. ज्या ठिकाणी विठ्ठल विटेवर उभी राहिले, तेथे विठ्ठल-रखुमाईचे मंदिर तयार करण्यात आले.


वारकरी संप्रदायातील भक्तमंडळी दरवर्षी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारी करतात. एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरपर्यंत केली जाणारी पदयात्रा म्हणजे वारी होय. वारकरी संप्रदायालाच भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय असेही म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकूण १२ महिन्यांमध्ये ४ वेळा वारी असते. त्यातील प्रमुख वारी म्हणजे आषाढी वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तगण आपापल्या गावातून बाहेर पायी चालत एकत्र येतात. अनेकजण आपल्यासह पालख्या देखील घेऊन येत असतात.


आषाढी वारीमध्ये (Ashadhi Wari)भक्त पायी चालत असताना वारीचा मार्ग हा विविध संताच्या कर्मभूमीला लागून जातो. यामध्ये देहू, आळंदी अशा पवित्र स्थळांचा समावेश असतो. वारीसह संताच्या पालख्या देखील पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी असते. वारी ठराविक ठिकाणी मुद्दामाला असते. त्यात रिंगण हे विशेष आकर्षण पाहायला लोक लांबून येत असतात. आषाढी व्यतिरिक कार्तिकी वारीलाही वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्व आहे. कार्तिकी वारीमध्ये आषाढी वारीच्या उलट संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात. या शिवाय माघ आणि चैत्र महिन्यातही वारी असते. वारी यावरुनच या संप्रदायाचे नाव पडले आहे – वारी करणारे म्हणजे वारकरी. तेराव्या शतकामध्ये वारीचा उल्लेख पाहायला मिळतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती. मिळालेल्या माहितीनुसार, हैबतबाबा आरफळकर यांच्यामुळे वारीमधील पालख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. ते सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावचे देशमुख होते. त्यांच्यामुळे आजच्या युगातही वारीची परंपरा जगभरात पोहोचली असे म्हटले जाते.


Read More
The ST department has appealed to give priority to ST even during the Ganeshotsav period in Palghar
पंढरपूरच्या वारीतून एसटीला ५६ लाखाचे उत्पन्न; गणेशोत्सवात देखील एसटीला प्राधान्य देण्याचे आवाहन

पंढरपूर यात्रा सण २०२५ आषाढी एकादशी निमित्त पालघर राज्य परिवहन महामंडळाने पालघर जिल्ह्यातून एकूण ५५ बसेसचे नियोजन केले होते. याकरिता…

Satara division earns Rs 1crore from Ashadhi Yatra
आषाढी यात्रेतून सातारा विभागाला एक कोटी ३२ लाख रुपयांचे उत्पन्न

आषाढी वारीच्या काळात सातारा जिल्ह्यातील अकरा आगारातून विशेष यात्रा गाड्यांचे नियोजन केले होते. जिल्ह्यातून २५६ बसद्वारे १३७७ फेऱ्या करण्यात आल्या.

ST Corporation decided to release 5000 additional buses for Konkan residents for Ganeshotsav
अखेर ‘त्या’ एसटी ड्रायव्हर, कंडक्टरचे निलंबन; पंढरपूरवरून परतताना मद्यधुंद अवस्थेत…

पंढरपूर-अकोट एसटी बस चालक व वाहकाने मद्यधुंद अवस्थेत चालवल्याचा धक्कादायक प्रकार प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बीड जिल्ह्यात उघडकीस आला होता.

Pandharpur Ashadhi wari, warkari crowd, faith
पांडुरंगाच्या भेटीसाठीची आतुरता नाही, म्हणून?

पंढरीच्या वारीची परंपरा उज्ज्वल आहेच पण ही परंपरा आठवून पाहाताना आज ती केवळ संख्येनेच वाढते आहे का, याचाही विचार व्हायला…

pandharpur celebrates mahadwar kalya festival with dahi handi ashadhi vari traditional ritual
पंढरीत आषाढी यात्रेची सांगता; हजारो भाविक सामील

कुंकू बुक्क्यासह लाह्याची उधळण करीत हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाद्वार काल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Vitthal
‘देव माझा विठू सावळा!’, देवासारखे शांत बसलेल्या ‘या’ चिमुकल्या विठोबाने जिंकले लाखो भक्तांचे मन, Video Viral

Child Dressed as Lord Vitthal Viral Video :व्हिडीओमध्ये, चिमुकल्याने सावळ्या विठ्ठलाची वेषभूषा परिधान केली आहे. ज्याला पाहून भक्तांना साक्षात विठूराया…

group prayers songs, Sarvatmaka Shivasundara meaning,
लोक लौकिक : परिपाठ – हरिपाठ प्रीमियम स्टोरी

समूहातील जगण्याची रीत आणि शिस्त या दोन्हीसाठी परिपाठ आणि हरिपाठ आवश्यक मानायला हवा. हे सहभागाचं तत्त्वज्ञान जगण्याची रीत ठरवत नेणारं…

MLA Manoj Ghorpade demands that the Jairam Swami palanquin of Vadgaon in Khatav tehsils be given a place of honor
जयराम स्वामी पालखीला मानाच्या दिंडीत स्थान द्या; आमदार मनोज घोरपडे यांची मागणी

शेतकऱ्यांना गरजेनुसार वीज जोडणी मिळावी आदी मागण्या आज आमदार मनोज घोरपडे यांनी विधानसभेत केल्या. कराड उत्तरमधील प्रलंबित प्रश्न आणि विविध…

The administration has issued a warning to the villages along the river as the Chandrabhaga river in Pandharpur is likely to flood
वारी संपताच उजनीतून भीमा नदीत विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणासह नीरा खोऱ्यातील वीर धरणातूनही भीमा नदीच्या पात्रात २१ हजार २९० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा…

Emotional video of elder disabled man in wari pandharpur ashadhi ekadashi viral video on social media
“बाबांच्या रुपात पांडुरंगच भेटला”, पंढरपूरला निघालेल्या आजोबांना पाहून डोळ्यात येईल पाणी; VIDEO तुफान व्हायरल फ्रीमियम स्टोरी

Ashadhi Ekadashi Wari Video: वृद्ध दिव्यांग आजोबांनी वारीत काय केलं पाहा…

Vaghati vegetables demand increase in Ashadhi Ekadash
आषाढीचा उपवास सोडण्यासाठी रानभाजी वाघाटीला मागणी; एक किलो वाघाटी १२०० रुपये

आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने वाघाटीला उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली. आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी…

Shilpa Thakre Ashadhi Ekadashi 2025
9 Photos
Photos: आषाढी एकादशीनिमित्त मराठी अभिनेत्रीचं विठ्ठलाच्या रुपात सुंदर फोटोशूट

या फोटोशूटला तिने ‘पांडुरंगाच्या पायाशी मनाची अर्पण… आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा…’ असे कॅप्शन दिले होते.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या