पुणे महापालिकेच्या हद्दीत सोमवारपासून पुन्हा लॉकडाउनची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर पुणेकरांची गरजेचं किराणाचं सामान घेण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. टिळक रोडवरील ‘ग्राहक पेठ’ या सुपर मार्केट बाहेर नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारी लांबलचक रांग लावली होती.