scorecardresearch

मनसे

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
Aaditya Thackeray on MNS Alliance
Aaditya Thackeray: “उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला पण…”, राजकीय सेटिंगचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

Aaditya Thackeray on MNS Alliance: महाराष्ट्र हितासाठी जो कुणी येईल त्याला बरोबर घेऊ, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

mumbai MNS workers protested drain cleaning delay by entering garbage filled drain
कचऱ्याने भरलेल्या नाल्यात व्हॉलीबॉलचा सामना… नालेसफाईतील दिरंगाईविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन

नालेसफाईतील दिरंगाईबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही संताप व्यक्त केला असून चांदिवली येथील कचऱ्याने भरलेल्या नाल्यात उतरून मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन…

NHM employee Financial crisis funding from the central government is stopped
केंद्र सरकारचा निधी अडकला अन् ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांवर कोसळले आर्थिक संकट ; नेमकं प्रकरण काय?

तब्बल तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली. या प्रश्नावर एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन कामबंद आंदोलन…

MNS aggressive over increased prices of CIDCO houses
सिडको घरांच्या वाढीव किमतीवरून मनसे आक्रमक, गजानन काळेंचा इशारा | MNS | CIDCO

आश्वासन देऊन देखील सिडकोच्या २६ हजार घरांच्या किंमती कमी करणार नसाल तर सोड्तधारकांना घेऊन आम्ही सत्ताधाऱ्यांच्या दाराशी येऊ, असा इशारा…

MNS demands cancellation of water cut in South Pune
दक्षिण पुण्याची पाणीकपात रद्द करण्याची मनसेची मागणी

अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाअभावी आणि राजकीय दबावापोटी या भागातील नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे,’ असा आरोप करून पाणीकपात तातडीने रद्द करावी,…

Maharashtra Navnirman sena allegations on mmrda
घोडबंदर रस्त्याच्या कामात एमएमआरडीएने दिली शासन नियमांना तिलांजली, मनसेचा आरोप

एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वतीने सुमारे ५०० कोटी खर्च करून घोडबंदर रस्त्याचे मुख्य व सेवा रस्ते एकत्रितपणे काँक्रिटीकरण पद्धतीने तयार करण्याचे काम…

karad mns news in marathi
कराड : महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात ‘मनसे’चा उद्या मंगळवारी सकाळी रास्ता रोको

शिंगण म्हणाले, महामार्गाचे काम करताना ‘काम कमी आणि गोंधळ जास्त’ घालणाऱ्या शासकीय यंत्रणेविरोधात हा रस्ता रोको आहे.

Jitendra Awhad
“मी हिंदू आहे हे सांगायला कुठल्या महाजनची गरज नाही”, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य चर्चेत

Jitendra Awhad : प्रकाश महाजन म्हणाले होते की “शरद पवारांच्या लक्षात आलंय की हिंदू धर्मापासून दूर जाऊन राजकारण करता येत…

detail information about Navi Mumbai School Case
Navi Mumbai School Case: बस चालकाकडून मुलावर अत्याचार, मुख्याध्यापकांवरही कारवाईची मागणी

नवी मुंबईतील एका शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या मुलावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या…

MNS counter hall, MNS , Political parties, loksatta news,
मनसेच्या प्रतिसभागृहाकडे राजकीय पक्षांची पाठ

मुंबई महापालिका सभागृहाच्या धर्तीवर मनसेने शनिवारी प्रतिसभागृह भरविले होते. या सभेत मुंबईतील विविध नागरी समस्या, रस्ते, आरोग्य, पालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन…

संबंधित बातम्या