scorecardresearch

अजय मिश्रा

अजय मिश्रा किंवा अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील राजकारणी आहेत. ते १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील सध्याचे राज्यमंत्री आहेत.ते उत्तर प्रदेशातील खेरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अजय मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिह्यातील बनवीर पूर या गावात झाला. आपल्या गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कानपूरला जाऊन तेथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाच्या ख्राईस्ट चर्च कॉलेज येथून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.


पुढे त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये सहभाग घेतला. २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या १६ व्या विधानसभेच्या निघासन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते तेथील आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये खेरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांची ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर त्यांना गृह मंत्रालयातील राज्यमंत्रीपद मिळाले. अजय मिश्रा यांची राजकीय कारकीर्द मोठी असली तरी त्या दरम्यान त्यांचे नाव अनेक प्रकरणांमध्ये आले. नव्वदीच्या दशकात त्यांच्यावर काही गुन्हे होते. पुढे प्रभात गुप्ता केसमुळेही ते चर्चेत आले. त्यानंतर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनामुळे अजय मिश्रा अडचणीत सापडले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या मतदारसंघाच्या एका कार्यक्रमाला अजय मिश्रा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये काही शेतकरी आंदोलकांनी काळे झेंडे फडकवत निषेध दर्शवला. यावरुन त्यांना आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यामुळे एकूणच वातावरण तापले. पुढे ३ ऑक्टोबर २०२१ यांनी अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या एका शेतकरी आंदोलनामध्ये भरधाव गाडी चालवत नेली. यामध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला आणि काही आंदोलक जखमी झाले असे म्हटले जात होते. यावरुन प्रकरण आणखी पेटले. पोलिसांनी आशीष मिश्रा यांना अटक केली. पुढे अजय मिश्रा यांच्या अटकेची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. काहींनी त्यांना पदावरुन काढून टाकावे असेही म्हटले. पण त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही.


Read More
udayanraje bhosale
VIDEO : उदयनराजे भोसले कॉलर उडवतात, डान्स करतात, ही भाजपाची शिस्त आहे का? केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच…

अजय मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा हे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

lakhimpur-6
“गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं, मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं”, ‘या’ भाजपा नेत्याची मागणी

भाजपा खासदार वरूण गांधी यांच्यानंतर आणखी एका भाजपा नेत्यानं या प्रकरणावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर तोफ डागलीय.

लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
Raj-Thackeray-uddhav-thackeray-aditya-thackeray
“ती यादी लपवण्यात छुपा राजकीय हेतू?” मविआ व मनसेचे निवडणूक आयोगाला सहा प्रश्न, निवेदनात काय म्हटलंय?

Mahavikas Aghadi MNS Delegation : मविआ व मनसेच्या संयुक्त शिष्टमंडळात मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी…

Mock drill at sewage treatment plant in Pimpri Chinchwad pune print news
पिंपरी चिंचवडमध्ये सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात ‘मॉक ड्रिल’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली उपअग्निशमन केंद्रामार्फत सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट) येथे गॅस लिकेज, स्वतःचा आणि इतरांचा बचाव, आग आणि…

Income Tax Departments raid at Khamla Sub Registrars Office
मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारात नोंदणी शुल्काची चोरी ; खामला उपनिबंधक कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे छापासत्र

प्राप्तिकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण शाखेने (आय अँड सी.आय.) सायंकाळी सहाच्या सुमारास कार्यालय बंद होत असतानाच ही कारवाई सुरू…

mumbai auto rickshaw taxi cab driver
ॲप आधारित रिक्षा, कॅबसाठी शासनमान्य दर लागू करा; नव्या नियमांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब लागण्याची शक्यता

ॲग्रीगेटर कंपन्या, चालक आणि प्रवासी यांच्यातील व्यवहार अधिक पारदर्शक होण्यासाठी ”महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” लागू करण्यात येणार आहे.

zee marathi vijaya babar kamali serial promo kamali starts preparations for elections in college
“इलेक्शनसाठी कमळी कंबर कसून उभी…”, गौरीला शोधण्यात कामिनीला येईल का यश? पाहा प्रोमो…

Kamli Serial Promo : कमळी कॉलेजमधील इलेक्शनसाठी करतेय तयारी, दुसरीकडे कामिनी घेतेय गौरीचा शोध; मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो…

Jupiter Transit 18 October 2024
४ दिवसांनी फक्त ‘या’ २ राशींवर कोसळणार संकट? देवगुरु मिथुन राशीचे घर सोडताच ताकही फुंकून प्यावे लागणार? वादळासारखा काळ येणार?

Guru Gochar 2025: गुरु बदलणार घर, पण ‘या’ राशींसाठी बदल ठरणार घातक? सावध राहा, सुरू होतोय आव्हानांचा काळ! पाहा तुमची…

riteish deshmukh praises kapil honrao actor shares screenshot of comment
“तुम्ही खूप छान अभिनेते आहात”, रितेश देशमुखकडून कपिल होनरावचं कौतुक; म्हणाला, “तुमची स्वप्नं…”

Riteish Deshmukh & Kapil Honrao : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील कपिल होनरावचं रितेश देशमुखकडून कौतुक; ‘राजा शिवाजी’ चित्रपटात करतायत…

Mumbai reay Road
रे रोड वाहनांसाठी खुले, पादचारी हैराण; वळसा घालून रे रोड स्थानकात प्रवेश

सुमारे १२० वर्षे जुन्या जागतिक वारसा इमारतीवरील तिकीट कार्यालयाची बांधणी करण्याची जबाबदारी महारेलकडे सोपवण्यात आली.

deepak parashar
“मी समलैंगिक…”, प्रसिद्ध अभिनेत्याचे वक्तव्य; पत्नीपासून विभक्त होण्याचे कारण सांगत म्हणाले, “ती माझ्याकडे…”

Actor Who left penniless by wife: ‘या’ अभिनेत्याने बी ग्रेड हॉरर चित्रपटांत केले काम; खासगी आयुष्याविषयी म्हणाले, “माझी पत्नी ८…

संबंधित बातम्या