scorecardresearch

अनिल अंबानी

अनिल अंबानी (Anil Ambani) हे एक भारतीय व्यावसायिक आहेत. अनिल हे धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा भाऊ आहे. अनिल अंबानी यांचा जन्म ४ जून १९५९ रोजी झाला. हे भारतीय उद्योगपती रिलायन्स ग्रुपचे (ऊर्फ रिलायन्स एडीए ग्रुप) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विलगीकरणानंतर जुलै २००६ मध्ये रिलायन्स समूहाची निर्मिती करण्यात आली. रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स पॉवरसह अनेक स्टॉक्स लिस्टेड कॉर्पोरेशन्सचे मालकही आहेत. अनिल अंबानी हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते, पण आता ते श्रीमंतांच्या यादीपासून कोसो दूर गेले आहेत. रिपोर्ट्सनुसार, २००७ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे ४५ बिलियन डॉलर्सची संपत्ती होती. एवढेच नाही तर २००८ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते सहाव्या स्थानावर होते. २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात विभागला गेला होता. मुकेश अंबानी यांना पेट्रोकेमिकल, टेक्सटाईल आणि रिफायनरी; तर अनिल यांना टेलिकॉम, फायनान्स आणि एनर्जीचा व्यवसाय मिळाला. वाटणीच्या वेळी अनिल अंबानींची स्थिती मजबूत मानली जात होती, कारण त्यांच्याकडे नव्या काळातील व्यवसाय होता. मात्र, असे असूनही ते यात विशेष काही करू शकले नाहीत आणि आज त्यांच्या कंपन्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागत आहे.


अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इनोव्हेंचर्स कंपनीला NCLT मध्ये आणून दिवाळखोरीची कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन फायनान्सर जेसी फ्लॉवर यांनी अनिल अंबानी यांच्या कंपनीला कर्जाची परतफेड न केल्यामुळे एनसीएलटीमध्ये ओढले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकास्थित फायनान्सरकडे येस बँकेने ४८,००० कोटी रुपयांचे बुडीत कर्ज हस्तांतरित केले होते, ज्यामध्ये अनिल अंबानींच्या कर्जाचाही समावेश होता.


अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सला जीएसटी इंटेलिजन्स डायरेक्टरेट जनरल (DGGI) ने ९२२.५८ कोटी रुपयांच्या कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. डीजीजीआयने कंपनीला नोटीस पाठवून कोट्यवधींच्या उत्पन्नावर जीएसटीची मागणी केली आहे. अनिल अंबानी संदर्भात सर्व बातम्या तुम्ही या सदरामध्ये वाचू शकता.


Read More
Anil Ambani News
Anil Ambani : अनिल अंबानींच्या ३ हजार कोटींच्या मालमत्तांवर टाच, ईडीची मोठी कारवाई

अनिल अंबानी यांच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई, पाली हिल येथील बंगल्यासह अनेक मालमत्तांवर टाच

Anil Ambani Yes Bank chargesheet CBI claims through chargesheet
अंबानींमुळे बँकेचे २,७०० कोटींचे नुकसान ; सीबीआयचा आरोपपत्राद्वारे दावा

सीबीआयने या प्रकरणी अनिल अंबानी, राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह १३ जण तसेच संस्थांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

Industrialist Anil Ambani withdraws petition
७५० कोटी रुपयांचे रिलायन्स कॉम कर्ज प्रकरण ; दिलासा मागण्यासाठीची याचिका अनिल अंबानींकडून मागे

प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आपल्याला उपलब्ध केली जाईपर्यंत बँकेला वैयक्तिक सुनावणी घेण्यापासून रोखण्याचे आदेश देण्याची मागणी अंबानी यांनी या याचिकेद्वारे…

SBIs decision regarding Ambanis account is clear
अनिल अंबानी यांचे खाते फसवे ठरवणारा निर्णय तर्कसंगत; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

दिवाळखोरीत असलेल्या अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सशी संबंधित त्यांचे कर्ज खाते एसबीएयने फसवे म्हणून वर्गीकृत केले होते. या आदेशाला अंबानी यांनी…

High Court
अनिल अंबानी यांचे कर्ज खाते फसवे जाहीर करण्याचा निर्णय योग्यच, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; एसबीआयच्या आदेशाविरुद्ध याचिका फेटाळली

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कर्ज खात्याला फसवे म्हणून वर्गीकृत करण्याचा एसबीआयचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी योग्य ठरवला व अंबानी यांना…

Anil Ambani
अनिल अंबानींच्या ‘या’ कंपनीविरोधात ED ची मोठी कारवाई, सहा ठिकाणी छापेमारी

ED Raids Against Reliance Infra : अनिल अंबानी यांच्या कंपनीवर आरोप आहे की या कंपनीच्या माध्यमातून परदेशात बेकायदेशीरपणे पैसे पाठवण्यात…

Anil Ambani High Court case
कर्ज खाती फसवी म्हणून वर्गीकृत करण्याचे प्रकरण, अनिल अंबानी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

न्यायाधीश रियाज छागला आणि न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या खंडपीठाने प्रकरणाची सुनावणी २४ सप्टेंबर रोजी ठेवताना तोपर्यंत अंबानी यांच्या खात्यांबाबत बँकेने…

Anil Ambani CBI Raid
Anil Ambani: १७ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानींच्या मुंबईतील घरावर सीबीआयचा छापा

CBI Raids On Anil Ambani: सात ते आठ अधिकारी अंबानी यांच्या निवासस्थानाची झडती घेत आहेत. शोधमोहीम सुरू असताना अंबानी आणि…

Two arrested in Pune Katraj for possessing illegal country made pistol
अनिल अंबानी चौकशीप्रकरणी पहिली अटक

सक्तवसुली संचालनालयाने ओडिशास्थित एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना (एमडी) अटक केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली.

ED Issues Lookout Circular Against Anil Ambani
Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ, ईडीने जारी केली ‘लूकआऊट’ नोटीस

आता अनिल अंबानी यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

ed summons anil ambani
अनिल अंबानी ईडीच्या रडारवर; आधी छापे, आता ३ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार!

ED Summons Anil Ambani: अनिल अंबानी यांना ईडीनं समन्स बजावले असून ३ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे.

anil ambani news in marathi
अनिल अंबानींच्या कंपन्यांवर पुन्हा छापे, ‘ईडी’ची सलग तिसऱ्या दिवशी कारवाई

अनिल अंबानींच्या मालकीच्या समूह कंपन्यांनी २०१७ ते २०१९ या कालावधीत येस बँकेकडून साधारण तीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

संबंधित बातम्या