चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे हे महाराष्ट्रातील राजकीय नेते असून त्यांचा जन्म १ जानेवारी १९५२ रोजी औरंगाबाद ( आताचे छत्रपती संभाजीनगर ) जिल्ह्यात झाला. त्यांनी १२ पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले आहे. राजकीय नेता, सामाजिक कार्यकर्ता ते उद्योगपती अशी चंद्रकांत खैरे यांची ओळख आहे. चंद्रकांत खैरे यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते होते.


चंद्रकांत खैरे यांनी १९८५ मध्ये आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून ते आजपर्यंत ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. १९८५ साली त्यांनी औरंगाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली. १९९० मध्ये त्यांनी औरंगाबाद पश्चिममधून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा २९ हजार १५५ मतांनी विजय झाला. १९९५ मध्ये ते पुन्हा एकदा आमदार झाले. तसेच १९९७ साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले.


पुढे १९९९ साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा पराभव केला. १९९९ ते २०१९ यादरम्यान, सलग चार वेळा औरंगाबादचे खासदार होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा परावभ झाला. चंद्रकांत खैरे सक्रीय राजकारणात असून ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत.


Read More
shiv sena thackeray group agitation chhatrapati sambhaji nagar water issue
पाच घागरीचे तोरण आणि ५० कार्यकर्ते, शिवसेनेचे ‘लबाडांनो पाणी द्या’ आंदोलन

‘लबाडांनो पाणी द्या’ असे फलक असणाऱ्या दोरीला घागरी बांधून शिवसेनेकडून विस्कटलेल्या संघटनेत पुन्हा चेतना भरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Chandrakant Khaire On Ambadas Danve
Chandrakant Khaire : ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर? “ते फक्त काड्या करतात”, चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंवर संतापले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Chandrakant Khaire offer to join Shiv Sena
चंद्रकांत खैरे शिंदे गटाचे निमंत्रण स्वीकारणार का ?

अंबादास दानवे यांच्यावर टीका करणाऱ्या चंद्रकांत खैरे यांची भूमिका बरोबर असून दानवे जेव्हापासून जिल्हाप्रमुख झाले तेव्हापासून शिवसेना घसरणीलाच लागली.

ambadas danve latest news loksatta
अंबादास दानवे – खैरे वादाने ठाकरे गटाची डोकेदुखी कायम

आजही विविध प्रकारच्या नियोजनात, उपक्रमात विरोधी पक्ष नेते दानवे आपणास विश्वासात घेत नाहीत, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी…

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “हात जोडून विनंती करतो, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका”, चंद्रकांत खैरेंचं व्यासपीठावर कार्यकर्त्यांना दंडवत

Chandrakant Khaire : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी मेळावे आणि बैठका घेण्यात येत आहे.

Former MP Chandrakat Khaire statement on the Malvan statue disaster print politics news
महापुरुषांच्या पुतळ्यांची मोडतोड झाली तर दंगली होतात; चंद्रकांत खैरे यांचे वादग्रस्त विधान, महायुतीची टीका

मालवण येथील पुतळा दुर्घटनेवरून महाविकास आघाडी सरकार महायुती सरकारला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न करीत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि…

Chandrakant Khaire
Chandrakant Khaire : “महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजेत”, चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य

Chandrakant Khaire Riots : जोडे मारो आंदोलनादरम्यान चंद्रकांत खैरे यांनी राज्य सरकारविरोधातील संताप व्यक्त केला.

Shiv Sena group Uddhav Thackeray
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “यावेळी काहीतरी…”

विधानसभा निवडणुकीच्या आधीच सध्या राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे.

Shiv Sena Thackeray group and Shiv Sena Shinde group
“आधी तिकीट आणून दाखवा, मग कोण कोणाला गाडतं…”; शिवसेना नेत्याचं ठाकरे गटाच्या नेत्याला आव्हान

विधानसभेच्या निवडणुकीतील तिकीटावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत.

Chandrakant Khaire
Chandrkant Khaire: “..तर गद्दारांना पाडण्यासाठी विधानसभा निवडणूक लढणार”, चंद्रकांत खैरेंची घोषणा

Chandrkant Khaire यांनी लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर करुन मला पाडण्यात आलं असाही आरोप केला आहे.

Bhagwat Karad on chandrakant Khaire
“विधानसभेपूर्वी भूंकप होणार, चंद्रकांत खैरेंसह १० जण इच्छुक, मला चार जणांचे फोन आले”, भाजपा नेत्याचा मोठा दावा प्रीमियम स्टोरी

विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे धमाके पाहायला मिळतील, असा दावा माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला आहे.

uddhav thackeray chandrakant khaire raju shinde
संभाजीनगर पश्चिम विधानसभेसाठी भाजपाचे राजू शिंदे ठाकरे गटात? खैरेही इच्छूक? नाराजी व्यक्त करत म्हणाले…

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जावी, अशी मागणी खैरे समर्थक आणि…

संबंधित बातम्या