scorecardresearch

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Shashi Tharoor on Vice President
Shashi Tharoor: उपराष्ट्रपतीपदाबाबत शशी थरूर यांना माध्यमांचा प्रश्न; काँग्रेसचे थरूर म्हणाले, “सत्ताधारी भाजपाकडे…”

Shashi Tharoor on Vice President: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ९ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. तर…

rahul gandhi alleges fake voters in karnataka says eci is dead controversy ECI criticism
देशातील निवडणूक यंत्रणा मृतवत राहुल गांधी यांची टीका; लोकसभा निवडणुकांमध्येही गैरप्रकाराचा आरोप

देशाताली निवडणूक यंत्रणा आधीच मृतवत झाली आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी निवडणूक आयोगावरील हल्ला आणखी तीव्र…

congress must introspect to regain political relevance mahavikas aghadi failure to lost workers congress marathi article
एका काँग्रेस कार्यकर्त्याची खंत प्रीमियम स्टोरी

निष्ठावान, कृतिशील कार्यकर्ते ही कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद असते. त्यातही पक्ष सत्तेवर नसतानाही त्याच्या हिताचा विचार करणारे कार्यकर्ते तर…

jain community holds peace march against ban on kabutarkhana Mumbai
मोक्याच्या जागा हडपण्यासाठी कबुतरखान्यावर कारवाई – माजी नगरसेवक पूरण दोषी यांचा आरोप

कबुतर खान्यावरील कारवाईच्या विरोधात ३ ऑगस्ट रोजी कुलाबा जैन मंदिर येथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत शांतिदूत यात्रा काढण्यात येणार…

Deputy Chief Minister Eknath Shinde targets Congress on Malegaon Verdict
“मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण…यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्यांची नार्को टेस्ट करा” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर निशाणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दुपारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.

Rahul Gandhi react to Desh ka raja kaisa ho Rahul Gandhi jaisa ho slogans Video
Rahul Gandhi : “देश का नेता कैसा हो…”, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया चर्चेत; Video आला समोर

काँग्रेस पक्षाच्या एका कार्यक्रमातील राहुल गांधी यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

Why BJP will be unhappy with its Uttarakhand panchayat poll
भाजपा पंचायत निवडणुकीच्या निकालामुळे नाराज? कारण काय? ‘या’ राज्यातील निवडणुकांनी का वाढवली चिंता?

BJP vs Congress Uttarakhand elections उत्तराखंडमध्ये पंचायत निवडणूक पार पडली. भाजपासह काँग्रेससाठीदेखील ही निवडणूक महत्त्वाची होती. शुक्रवारी उशिरा संध्याकाळी उत्तराखंडमधील…

Congress leaders in Thane took to the streets to fill potholes at the ST station against ST privatization
congress news : खासगीकरणाविरोधात काँग्रेस रस्त्यावर; एसटी स्थानकातच बुजवले खड्डे

राज्य परिवहन उपक्रमाच्या (एसटी) बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. त्याचा फटका स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असतानाच, एसटी महामंडळाच्या जागा…

latest marathi news
PM Modi: “पाकिस्तान अस्वस्थ, पण वेदना मात्र काँग्रेस आणि…”, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

PM Modi On Operation Sindoor: पंतप्रधानांनी यावेळी यावर भर दिला की, ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे गुन्हेगार देखील…

Congress workers meet Satej Patil
राधानगरीत पाटील गटाच्या निर्णयानंतरही काँग्रेस कार्यकर्ते सतेज पाटील यांच्यासोबत

राधानगरी तालुक्यातील काँग्रेसजन पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दर्शवण्यासाठी तालुक्यातील प्रमुखांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांची भेट घेऊन सोबत राहण्याची ग्वाही…

संबंधित बातम्या