भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी काम पाहिले. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती तर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. ओडिशा सरकारमध्ये त्यांनी लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर १९९७ साली त्या राजकारणात उतरल्या. ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपाच्या आमदार झाल्या.
त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान ओडिशा सरकारमध्ये मंत्रीही होत्या.Read More
Presidents names controversy Mallikarjun Kharge काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडमधील आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ…
सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलच्या सुनावणीमध्ये विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना एका विशिष्ट कालमर्यादेत मंजुरी द्यावी वा ती नामंजूर करावीत, असे निर्देश दिले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मोठी मागणी…