scorecardresearch

द्रौपदी मुर्मू Photos

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी काम पाहिले. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती तर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. ओडिशा सरकारमध्ये त्यांनी लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर १९९७ साली त्या राजकारणात उतरल्या. ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपाच्या आमदार झाल्या.

त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान ओडिशा सरकारमध्ये मंत्रीही होत्या.
Read More
Rashtrapatni remark against President Murmu Loksabha issue Sonia vs Irani
16 Photos
Photos: संसदेत स्मृती इराणी आणि सोनिया गांधींमध्ये बाचाबाची; ‘राष्ट्रपत्नी’ प्रकरणावरुन तुफान गोंधळ, सुप्रिया सुळेंसहीत अनेकांनी केली मध्यस्थी

“काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी,” अशी मागणी लोकसभेमध्ये करण्यात आली.

Mercedes-Benz S600 Pullman Guard for President of India
6 Photos
Photos : मर्सिडीज बेंन्झ एस ६०० पुलमन गार्ड; राष्ट्रपतींच्या ताफ्यातील अलिशान कार, किंमत जाणून घ्याल तर बसेल धक्का

गेल्या अनेक वर्षांपासून ही गाडी राष्ट्रपतींच्या ताफ्यात दाखल आहे.

ramnath kovind narendra modi
12 Photos
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभासाठी PM मोदींकडून स्नेहभोजनाचं आयोजन, पाहा PHOTOS

Ram Nath Kovind Farewell: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

ताज्या बातम्या