scorecardresearch

दसरा २०२५

‘दसरा’ किंवा ‘विजयदशमी’ (Dussehra) हा हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. दसरा हा या शुभ मुहूर्तांपैकी एक आहे असे मानले जाते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते काम पूर्ण होते अशी अनेकांची आस्था आहे. यामुळे पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या दिवशी राजे-महाराजे आपल्या सैन्यासह लढाई करण्यास निघत असत असेही म्हटले जाते. क्षत्रियांप्रमाणे व्यापारी मंडळीही याच दिवशी व्यापारासाठी बाहेर पडत, गावची सीमा ओलांडत असत. गावाची, नगराची सीमा ओलांडण्याच्या याच कृतीवर दसऱ्याशी निगडीत “सीमोल्लंघन करणे” ही म्हण प्रचलित झाली असा अंदाज लावला जातो. मुळात सीमोल्लंघन करणे म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नव्या ध्येयासाठी पुढे जाणे होय.


दसऱ्याला (Dasara)काहीजण विजयदशमी असेही म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैत्य महिषासुर आणि दुर्गा यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. या युद्धाचा शेवट दसराच्या दिवशी झाला. अश्विन दशमीच्या दिवशी विजय मिळाल्यामुळेही या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणत असावेत असे असू शकते. दसऱ्याशी अन्य पौराणिक गोष्टीही संबंधित आहेत. भगवान श्रीराम यांनी राक्षसांचा राजा रावण यांचा वध दसऱ्याला केला होता. यामुळेच दसऱ्याला रावणवध देखील साजरा केला जातो. भारतात त्यातही उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दसऱ्याला रावणाचे मोठ्ठाले पुतळे तयार करुन ते जाळले जातात. या पुतळ्यांसह आपल्या सर्वांच्या आत असलेली नकारात्मक शक्तीही नाहीशी होवो असा विचार दडलेला आहे असे म्हटले जाते.


दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले म्हणजेच त्यांनी सीमोल्लंघन केले. अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी म्हणून आपापली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवली होती. दसऱ्याला सर्व पांडवांनी ती शस्त्रे बाहेर काढून त्या पाचही भावंडांनी शस्त्रांची पूजा केली. यामुळेच आपल्याकडे विजयादशमीच्या, दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंची पूजा केली जाते. पूजा करताना सरस्वती मातेचे आवाहन देखील केले जाते. महाराष्ट्रामध्ये दसऱ्याला आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या जातात.


Read More
Shalivahan Shaka calendar, Hindu calendar rules, Panchang compliance, missing lunar month, lunar calendar adjustments, Hindu month names, Hindu calendar,
काळाचे गणित : नियमबद्धतेसाठी किरकोळ गैरसोय

‘काळाचे गणित’ सोडवताना नियम तर हवेत. पण त्याने सर्वसामान्यांची काहीही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता पंचांगकर्त्यांनी घेतली आहे. पण…

Worship of Bhavani Talwar by Udayanraje in Satara
साताऱ्यात उदयनराजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन; विजयादशमीचा पारंपरिक सोहळा उत्साहात

या वेळी जलमंदिर येथील भवानी देवी मंदिरामध्ये ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या भवानी तलवारीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.

Grand procession in Akola on the occasion of Dhamma Chakra Pravartan Day
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यात भव्य मिरवणूक; चित्तधरारक प्रात्यक्षिकांचा थरार, ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात…

या मिरवणुकीत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हजाराे अनुयायांनी…

Jejuri Mardani Dasara celebrated grand Khandoba palanquin Dussehra festival 2025
दसरा २०२५ : जेजुरी नगरीत १९ तास मर्दानी दसरा….

गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला मर्दानी दसरा सोहळ्याची खंडा उचलणे स्पर्धा झाल्यावर तब्बल १९ तासांनी सांगता झाली.

Two youths from Daroda village in Hinganghat Wardha drowned in Vana river
Vidio: दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, एक वाचला. विसर्जन सोहळा आणि तणावाची घटना पण…

हे दोघेही दारोडा येथील रहिवासी असून देवी विसर्जनासाठी नदीकाठी गेले होते. मात्र विसर्जनाच्या वेळी पाण्यात तोल जाऊन दोघेजण वाहून गेले.…

Important statement by former President of India Ram Nath Kovind
संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती म्हणतात…. संविधानामुळे सर्वोच्च पद

कोविंद म्हणाले की, “मी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातून आलो आहे. पण आज मी ज्या पदावर पोहोचलो, त्याचे संपूर्ण श्रेय…

Armed soldiers pay tribute to Dhavir Devasthan in Roha
कोकणातील एक देवस्थान, जिथे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस सशस्त्र मानवंदना देतात…जाणून घ्या कुठे?

सशस्त्र जवानांकडून देवस्थानाला मानवंदना देण्याची प्रथा देशात फारशी आढळून येत नाही. मात्र रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धावीर देवस्थानला दरवर्षी पोलीसांकडून…

dussehra celebration ends in murder jalgaon Suspect Arrested Swift Action dnyaneshwar patil
जळगावमध्ये दसऱ्याला गालबोट… दोघांकडून तरूणाची मध्यरात्री हत्या !

दोन हल्लेखोरांनी किरकोळ वादातून थेट हत्येचे पाऊल उचलल्याने तरुणांमध्ये वाढती आक्रमकता आणि कायद्याचे भय नसल्याचे स्पष्ट…

Jalgaon Gold Rate Relief Buyers Price Drop Post Dussehra
दसऱ्यानंतर सोने पुन्हा स्वस्त…जळगावमध्ये आता नेमका किती दर ?

Gold Rate : जळगावमध्ये सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २१ हजार १२८ रुपयांपर्यंत घसरले, ज्यामुळे खरेदीदारांना थोडा…

Nashik Crime Wave Dussehra Murder Lawlessness Grip
हत्या क्रमांक ४३… नाशिकमध्ये दसऱ्याला पहाटे तोडफोड, रात्री हत्या

नाशिकरोड परिसरात दसऱ्याच्या दिवशी वाहनांची तोडफोड आणि दांडिया खेळताना किरकोळ वादातून युवकाची हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

11-year-old boy dies after getting stuck in lift
दसऱ्याच्या दिवशी दुर्दैवी अपघात; लिफ्टमध्ये अडकून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय फडतरे हा अकरा वर्षीय मुलगा लिफ्ट सोबत खेळत होता.

ramdas kadam statement on balasaheb thackeray deadbody eknath shinde shivsena melawa
Ramdas Kadam: रामदास कदमांचा गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Ramdas Kadam: मुंबईतील (Mumbai) नेस्को सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यांच्या निमित्ताने एकमेकांवर राजकीय…

संबंधित बातम्या