scorecardresearch

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या स्थापन केलेले सरकार शिवसेना भाजपाचेच आहे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.

ते शिवसेनेचे (Shivsena) सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून विधानसभेचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होते आणि तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेते होते.

त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथून झाले. नंतर त्यांनी ५६व्या वर्षी बीएची डिग्री प्राप्त केली. त्यांनी श्रीमती लता एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत शिंदे आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते कल्याण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.


Read More
MLA, Ajit Pawar group,
शिंदे गटाच्या बैठकीस अजित पवार गटाचे आमदार उपस्थित, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात गोंधळाची स्थिती

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत आधीच बिघाडी झाली असताना आता प्रचारातही गोंधळ निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Breaking News Live Today
Maharashtra News Live Update : “जरांगेंसाठी रेड कार्पेट, ओबीसींच्या आंदोलनाकडे नेते फिरकतही नहीत”; उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची व्यथा

Marathi News Live Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

Eknath Shinde assured the Government Employees Association that the retirement age of government employees is 60
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६०; मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटना आश्वस्त प्रीमियम स्टोरी

केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ वरुन ५० टक्के केला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी…

Eknath Shinde order to office bearers to start preparations for Legislative Assembly election
विधानसभेच्या तयारीला लागा; मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; बुधवारी वर्धापन दिन

शिवसेनेचा १९ जून रोजी ५८ वा वर्धापन दिन असून त्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी…

Loksatta anvyarth Deputy Chief Minister Ajit Pawar expressed opinion that the Grand Alliance has suffered losses in the elections due to the onion issue
अन्वयार्थ: किती काळ रडत बसणार?

शेतकऱ्यांच्या नाराजीचा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असतानाच कांदा प्रश्नामुळे महायुतीचे निवडणुकीत नुकसान झाल्याची भावना उपमुख्यमंत्री…

Chief Minister Eknath Shinde allegation regarding urban Naxals at the Mahayuti meeting in Thane
अर्बन नक्षल आता काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शिरले  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी पध्द्तशीरपणे खोटे कथानक नागरिकांमध्ये पोहचविले.

Devendra Fadnavis On Konkan Graduates Constituency
“महायुतीला तडीपार करणार म्हणणाऱ्यांना…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “कोकणाने…”

आज ठाण्यात निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली.

Amol Kirtikar Ravindra Waikar
“ईव्हीएम आणि मोबाईलचा संबंध…”, किर्तीकर अन् वायकरांच्या वादावर निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “ईव्हीएम…”

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील या मतमोजणीसंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

Ravindra Waikar
“पराभव जिव्हारी लागल्याने रडीचा डाव…”, रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार; म्हणाले, “मी महत्व…”

रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला. “पराभव जिव्हारी लागल्यामुळे हा रडीचा डाव सुरू आहे”, अला हल्लाबोल…

amol kirtikar ravindra waikar marathi news
“अमोल किर्तीकरांचा पराभव EVM नव्हे, तर पोस्टल मतांमुळे झाला”, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; मांडलं मतांचं गणित!

“EVM मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईलवर ओटीपी आला असे दावे केले जात आहेत. या देशातलं कोणतंही ईव्हीएम मशीन…”

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरेंचं एनडीए सरकारबाबत मोठं विधान; म्हणाले, “काही महिन्यात दिल्लीत…”

ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनीही केंद्रातील एनडीए सरकारबाबत मोठं विधान केलं आहे.

t raja singh statement news marathi
“४०० पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं”, भाजपा आमदाराचं विधान चर्चेत; भिवंडीतील धर्मसभेत केलं भाष्य!

टी. राजा म्हणाले, “एकनाथ शिंदे, तुम्हाला कुणाचं भय आहे? घाबरू नका, देशभरातले हिंदू तुमच्यासोबत आहेत!”

संबंधित बातम्या