scorecardresearch

गिरीश बापट

गिरीश बापट (Girish Bapat)हे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले. गिरीश बापट यांची २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली होती. गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. त्याने तळेगाव दाभाडे येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बीएमसीसीत प्रवेश घेतला. पदवी संपादन केल्यानंतर त्यांना टेल्कोमध्ये नोकरी लागली. नोकरी सुरु असताना लगेचच आणीबाणीचा काळ आला. आणीबाणीत सरकारविरोधी भूमिकेमुळे त्यांना १९ महिने तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगामध्ये असताना त्यांच्यातील पुढारी तयार झाला. ते सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रभावित होते.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली. १९८० मध्ये गिरीश बापट भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर विभागाचे प्रमुख बनले. पुढे १९८३ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग तीन टर्म त्यांच्याकडे नगरसेवकपद होते. १९८६-८७ मध्ये ते महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष होते. १९९५ मध्ये त्यांना पहिल्यांदा आमदारकीच्या निवडणूकीचे तिकीट मिळाले. निवडणूक जिंकून गिरीश बापट आमदार झाले. तेव्हापासून ते २०१४ पर्यंत ते तब्बल पाच वेळा निवडून आले.


२०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे मंत्रीपद देखील होते. २०१९ मध्ये काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव करत त्यांनी खासदारकी मिळवली. २९ मार्च २०२३ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी गिरीश बापट यांचे निधन झाले.


Read More
Internal dispute within pune BJP news in marathi
शहरबात : भाजपचा पुण्यातील कारभारी कोण?

प्रत्येकजण आपले अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी धडपड करू लागल्याने पुणे शहराचा भाजपचा कारभारी नक्की कोण? असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे.

Ravindra Dhangekar criticism
गिरीश बापट, मुरलीधर मोहोळ यांची तुलनाच होऊ शकत नाही; रवींद्र धंगेकर यांची टीका

मोहोळ हे रस्त्यावर कधीही न फिरलेले नेते आहेत, बापट यांचे कार्यालय कोणी फोडले, हे पुणेकर अद्याप विसरलेले नाहीत, अशा शब्दांत…

Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

काँग्रेस उमेदवाराचा त्यांच्या पक्षातील नेत्यांवर विश्वास नसल्यामुळेच त्यांच्यावर भाजप नेत्यांची छायाचित्र वापरण्याची वेळ आल्याची टीका गौरव बापट यांनी केली.

Neelam Gorhas criticism without mentioning the name of Dhangekar if it was Bapat Saheb
Neelam Gorhe on Ravindra Dhangekar: बापट साहेब असते तर…; धंगेकरांचं नाव न घेता नीलम गोऱ्हेंची टीका

काँग्रेसचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं एक पोस्टर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्या फोटोसह भाजपाचे दिवंगत माजी खासदार गिरीश…

High Court Central Election Commission Pune Lok Sabha by-election not conducted mumbai
“पुणे लोकसभा पोटनिवडणूक का घेतली नाही? भूमिका स्पष्ट करा, अन्यथा…”, उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला इशारा!

याबाबत भूमिका स्पष्ट करा अन्यथा ११ डिसेंबर रोजीच्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देण्याचा इशारा न्यायालयाने आयोगाला दिला.

BJP, pune, politics, Executive committee, appointments
पुणे भाजपाला घराणेशाहीची लागण, जुनेजाणते घरी प्रीमियम स्टोरी

निष्ठावंतांना डावलण्याबराेबरच कार्यकारिणीमध्ये घराणेशाहीला स्थान देण्यात आल्याने भाजपचा बेगडीपणा उघड झाला आहे.

Swarda Bapat in the Executive Committee
पुणे शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर; गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांना कार्यकारिणीत स्थान

शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून कार्यकारिणीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

by election in pune
मुंबई: पोटनिवडणुका टाळण्याकडे पक्षांचा कल?

लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर ही जागा भरण्याकरिता सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक घेण्याची लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे.

sharad pawar girish bapat
“मी गिरीश बापट यांना सांगितलं की मलाही तुमच्यासारखाच त्रास…”, शरद पवारांनी सांगितली ‘ती’ आठवण; २००४मधील प्रसंगाचाही केला उल्लेख!

शरद पवार म्हणाले, “२००४ मध्ये मला डॉक्टरांनी सांगितले होते की तुमच्याकडे साधरणतः सहा महिने आहेत. तुम्हाला काही गोष्टी करून ठेवायच्या…

girish bapat गिरीश बापट
खासदार बापट यांच्या स्मरणार्थ उद्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ रविवारी (१६ एप्रिल) सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या