भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.
भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.Read More
तटरक्षक दलाला समाजमाध्यमातून भरकटलेल्या जहाजांना मदत व सहकार्य करण्याची विनंती करणारे संदेश पाठविले असून त्यात मासेमारी बोटींचीही माहीती देण्यात आलेली…
दक्षिण मुख्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या भविष्यातील संरक्षण सिद्धतेसाठी ‘जय’ (संयुक्तता, आत्मनिर्भरता, नवोपक्रम) हा मार्गदर्शक…
सीमावर्ती भागातील जवानांसाठी दिवाळी फराळ दिवाळीच्या दिवशी मिळावा या विचारातून आतापासून दिवाळी फराळाचे डबे भरून ते बंदिस्त करण्याच्या कामाला सोमवारपासून…
Indian Navy Launched INS Androth : आयएनएस ‘अँड्रोथ’ ही एक पाणबुडीविरोधी छोटेखानी युद्धनौका आहे. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील अँड्रोथ बेटावरून तिचे…
भारतीय नौवहन क्षेत्राला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कॅप्टन पुरुषोत्तम बर्वे यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या ७७ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत…