scorecardresearch

विनायक परब

गेली ३३वर्षे विनायक परब पूर्णवेळ पत्रकारितेत असून सुरुवातीस मुंबई तरुण भारत (१९९०-९१) नंतर सांज लोकसत्ता (१९९२-९७), लोकसत्ता (१९९७- २०१२), लोकप्रभा (२०१२-२०२२) मध्ये कारकीर्द करून सध्या ते लोकसत्ता डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी २०००- २००६ या कालखंडात त्यांनी लोकसत्ता मुंबई डेस्क प्रमुख म्हणून तर २००६- १२ या कालखंडात त्यांनी मुंबई ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक म्हणूनही काम पाहिले.
संरक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर त्यांचे विपुल लेखन असून या सर्व विषयांमध्ये तज्ज्ञ म्हणून त्यांचा वेगळा परिचय आहे. ते पुरातत्वज्ञ असून पुरातत्व आणि बौद्ध अभ्यास या दोन्ही विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये त्यांना मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. २०१४ साली एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने त्यांना बुद्धीस्ट स्टडीज या विषयात फेलोशिप देऊन सन्मानित केले. बौद्ध ज्ञानशास्त्राचा आधार भारतीय संरक्षण दलांच्या धोरणात्मक निर्णयासाठी कसा घेतला जाऊ शकतो, यावर संशोधनप्रबंध सादर केला आहे. जम्मू आणि काश्मीर त्याचप्रमाणे तेथील दहशतवाद या विषयाचा त्यांचा गेल्या २० वर्षांहून अधिक अभ्यास असून काश्मीरमधील अनेक दहशतवादीविरोध कारवायांचे त्यांनी प्रत्यक्ष वार्तांकन केले आहे. त्यासाठी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे २००६ साली रायकर- बोस शोधपत्रकारीता पुरस्काराने गौरविण्यातही आले आहे. २००६ सालीच त्यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल द. म. सुतार पुरस्कारही प्राप्त झाला. तर मुंबईच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या सिटीवॉक मुंबई या तब्बल १२ वर्षे चाललेल्या लोकसत्तामधील स्तंभलेखनासाठी मानाचे समजले जाणारे भ्रमंतीकार प्रमोद नवलकर मानचिन्ह देऊन त्यांना २००९ साली गौरविण्यात आले. विनायक परब यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.

Al Aksa REUTERS
विश्लेषण : अल- अक्सा संघर्षाच्या मूलस्थानी आहे तरी काय?

इस्राइलमधील अल अकसा मशिदीच्या परिसरात गेली तीन वर्षे सातत्याने संघर्षपूर्ण परिस्थिती उद् भवते आहे, काय आहे या मागचे मूळ कारण?

nasa, tempo
विश्लेषण: NASA वायूप्रदुषणाचे मोजमाप अंतराळातून कशासाठी? प्रीमियम स्टोरी

NASA: ‘पृथ्वीवरील मानवी जीवन खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध करण्यासाठी’ असे सांगत ‘नासा’ने थेट एक उपकरणच अंतराळात धाडले आहे, जे उत्तर…

Indus water treaty, Kashmir
विश्लेषण : सिंधू जलवाटप करार; भारताने पाकिस्तानला नोटीस पाठवण्यामागचे कारण काय?

भारतातून उगम पावणाऱ्या आणि जम्मू- काश्मीरमधून पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या नद्यांच्या पाणीवाटपाचा निर्णय सिंधू जलवाटप कराराच्या चौकटीतच घेतला जातो, त्याविषयी…

Etymology of the word Bhagwa deepika padukon, orange, saffron, bikini, pathaan, controversy
विश्लेषण: दिपिकाच्या बिकीनीमुळे ‘भगवा’ रंग चर्चेत; पण हा शब्द नेमका आला कुठून? तो खरंच रंगासाठीच वापरला जातो का? प्रीमियम स्टोरी

History of the word Bhagwa गेले काही दिवस दिपिका पदुकोणने ‘पठाण’ चित्रपटात परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून देशभर गदारोळ सुरू आहे.…

drugs smuggling, narcotic, indian navy
विश्लेषण: आंतरराष्ट्रीय तस्करांकडून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नव्या मार्गाचा वापर; तालिबान्यांचा मोठा हातभार, वाचा सविस्तर!

केवळ गांज्याचे उत्पादन करून भागत नाही. तर त्यावर प्रक्रिया करणारे रसायन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावे लागते. या साऱ्याचा शोध घेतल्यानंतर…

rakhigarhi
विश्लेषण : भारतीयांच्या वांशिक शुद्धतेच्या चाचणीवरून वाद कशासाठी? प्रीमियम स्टोरी

भारतातील सुमारे १०० हून अधिक विख्यात संशोधक, इतिहासतज्ज्ञ, वैज्ञानिक आदींनी सरकारला पत्र लिहून या वांशिक शुद्धता प्रकल्पास तीव्र विरोध दर्शविला

when did religion start
विश्लेषण : धर्म केव्हा अस्तित्वात आला? तुर्कस्तानमधील उत्खननात मिळाले पुरावे? प्रीमियम स्टोरी

एका बाजूस शिकार करून गुजराण करत असतानाच जगातील पहिला धर्म अस्तित्वात आला, असे नवे गृहितक पुढे आले आहे, त्या संबंधातील…

electric bike fire
विश्लेषण : विजेवर चालणाऱ्या वाहनांना आग; चौकशीत नेमके काय लक्षात आले? प्रीमियम स्टोरी

ओला, ओकिनावा, प्युअर इव्ही, बूम मोटार आणि जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेइकल्स या कंपन्यांच्या एकूण नऊ गाड्यांना आग लागल्याच्या घटना वर्षभरात घडल्या.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या