भारतीय रेल्वे विभागामध्ये तिकीट व्यवस्थापन, पर्यटन सेवा आणि खाण्या-पिण्याची सोय करणे ही कामे आयआरसीटीसी (IRCTC) संस्था पाहत असते. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची स्थापना २७ सप्टेंबर १९९९ रोजी झाली. या संस्थेद्वारे तत्काल टिकीट काढणे, ऑनलाईन टिकीट सेवा, रेल्वे पर्यटनास चालना देणे (महाराजा एक्सप्रेस यांसारख्या ट्रेनची सुरुवात करणे), रेलनीर अशा संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. आयआरसीटीसीची सेवा (IRCTC Service) ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेता येते. यांच्यामार्फत रेल्वेमध्ये जेवण पुरवले जाते.
१९९९ पासून या संस्थेची मालकी रेल्वे प्रशासनाकडे होती. पुढे २०१९ मध्ये या संस्थेची नोंदणी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये झाली. त्यानंतर भारत सरकारने त्यामधील होल्डिंग ८७ टक्क्याने कमी केले. डिसेंबर २०२२ मध्ये सरकारने पुन्हा २० टक्क्यांची गुंतवणूक केली. Read More
दिवाळी सणानंतर कोकणातून मुंबईत येण्यासाठी श्रेयस पटवर्धन यांनी शनिवारी तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण केले. वेळापत्रकानुसार कुडाळ स्थानकात सायंकाळी ५ वाजता येणारी…
आयआरसीटीसीचे संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपवरून तिकीट काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सामान्य आरक्षित तिकिटांचे आरक्षण सुरू होण्यापूर्वी १० मिनिटांच्या मर्यादित वेळेत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालपणी चहा विकलेल्या गुजरातमधील वडनगर रेल्वे स्थानकात आता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘चहा’ संकल्पनेवर आधारित आधुनिक फूड…