कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड (Karad) असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना (Krushna and Koyna) या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर आहे. या नद्या महाबळेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र होत. कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले. कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कराड समग्र दर्शन हे विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे.Read More
कराड शहरच्या प्रवेशद्वारावरील कोल्हापूर नाक्यावरून जाणाऱ्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या भव्य पुलाचे काम रखडल्याने ऐन तळपत्या उन्हात सतत वाहनांच्या लांबच…
महाराष्ट्रातील पहिल्या डोंगरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला, या यशस्वी उपक्रमात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगत या महोत्सवाचे संकल्पक, राज्याचे पर्यटनमंत्री…
वडोली निळेश्वर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरुद्ध व ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्यावरील कारवाईसाठी सुरू असलेले धरणे आंदोलन आमदार घोरपडे यांच्या पुढाकाराने सोडवण्यात…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची येथील भवानी शाखा आणि लोककल्याण मंडळ न्यासातर्फे आयोजित ‘राष्ट्रनिर्मितीत…
ध्येयनिश्चिती केल्यावर थांबू नका, ते गाठण्यासाठी वेळप्रसंगी अवघड वाटा चोखाळा, ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन अथक परिश्रम घ्या, असे आवाहन विश्वविक्रमवीर अल्ट्रा…