महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.
या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत. Read More
अमेरिकेने सुरू केलेल्या ‘टेरिफ वॉर’मुळे जगावर मंदीचं सावट आहे. कोकणातील अर्थव्यवस्था आपल्याला स्वयंपूर्ण बनवावी लागेल.असे मत माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री…
उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नियमित प्रवाशांसह नवख्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक विशेष रेल्वेगाडी चालवण्यात…
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी दरम्याने ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.