सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.
२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.
मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.Read More
आरक्षण आंदोलनानंतर मनोज जरांगे आता शेतकरी नेतृत्त्वाकडे वळत असल्याची चर्चा सुरू असून, मराठवाड्यातील शेती प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसत…
Devendra Fadnavis Maratha OBC Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एका समाजाचे काढून दुसऱ्याला देणार…
राज्यातील लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा २०२४ मध्ये केलेल्या कायद्याच्या…
पहिल्या जी.आर.मुळे ओबीसी नाराज झाले आणि त्याबाबतच्या स्पष्टीकरणाने पुन्हा मराठे नाराज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरक्षण प्रकरणात सरकारची संपूर्णत: कोंडी…