scorecardresearch

मनसे

९ मार्च २००६ रोजी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना झाली. राज ठाकरे हे पक्षाध्यक्ष आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले तेव्हा राज ठाकरे आणि त्यांना समर्थन करणारा शिवसेनेतील गट नाराज झाला. तेव्हा जानेवारी २००६ मध्ये राज यांनी शिवसेना पक्ष सोडला.


पुढे दोन महिन्यांनी मार्च २००६ मध्ये त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस यांना वैभव प्राप्त करुन देणे हे या पक्षाचे प्रमुख ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाने हिंदुत्त्वाची विचारसरणी स्वीकारली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचे १३ उमेदवार निवडून आले. त्यानंतर २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकांमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने चांगली कामगिरी केली. तेव्हा नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. सुरुवातीच्या काळात हा पक्ष खूप चर्चेत होता. राज ठाकरे यांचे भाषण आणि नेतृत्त्व यांमुळे तरुण या पक्षामध्ये सहभाग घेत होते. अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्येही या पक्षाचे नाव जोडले गेले होते. हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊ लागला. पक्षाला निवडणुकांमध्ये अपयश मिळू लागले. बरेचसे नेते, प्रवक्ते पक्ष सोडून जाऊ लागले. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेच्या केवळ एकाच उमेदवाराचा विजय झाला होता.


राज ठाकरे आपल्या विधानांवरून नेहमी चर्चेत असतात. त्यांनी मशिदीतील भोंग्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे हा विषय तापला होता. विरोधीपक्षांवर टीका करण्यासह ते मित्रपक्षांवरदेखील टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. २०२४ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे आणि ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांच्यासाठी सभा घेतली होती.


Read More
Govinda Dahi Handi Thane, 10 layer Govinda record, Pratap Sarnaik Dahi Handi, Konkannagar Govinda team,
Dahi Handi 2025 : तीनवेळा १० थर लागताच, जय जवाननी अविनाश जाधवांसोबत गुलाल उधळला, म्हणाले बाप-बाप होता है….

जय जवान गोविंदा पथकाने सरनाईक यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी १० थर रचले आणि व्यासपीठावर जल्लोष केला. त्यानंतर ते मनसेच्या हंडीत आले.…

Opposition parties are preparing for the march in full swing, prioritizing civic issues including law and order
…अन्यथा नाशिकमध्ये निवडणुकीत विरोधकांना लाभ – छगन भुजबळ यांचा इशारा

शहरातील गुन्हेगारीचा उंचावणारा आलेख, अमली पदार्थांची विक्री, महिलांवरील अत्याचार, छेडछाडीचे प्रकार, खड्डेमय रस्ते, अपुरा पाणी पुरवठा आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी…

Dahi Handi 2025 Celebration : Jai Jawan Govinda team from Jogeshwari set a record of ten layers
Dahi Handi 2025 : जय-जवान गोविंदा पथकाची विक्रमाशी बरोबरी, तीन ठिकाणी १० थरांचा थरार

Krishna Janmashtami Dahi Handi Celebration : शनिवारी कोकण नगर गोविंदा पथकाने प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये १० थर…

MNS leader Avinash Jadhav's suggestive statement during the Dahi Handi program regarding the alliance between the two Thackeray brothers
मनसे नेते अविनाश जाधव यांचे दोन्ही ठाकरे बंधूच्या युतीबाबत सुचक विधान.., म्हणाले, “दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा डिएनए एकच म्हणून..”

आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. असे असतानाच, मनसे नेते अविनाश जाधव यांनी दहीहंडी कार्यक्रमादरम्यान…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उद्धव ठाकरे (छायाचित्र पीटीआय)
ठाकरे बंधुंची युती झाल्यास भाजपाला बसणार मोठा फटका? निवडणुकीतील आकडेवारी काय सांगते?

Thackeray Brother Alliance : मनसेचं राजकीय बळ कमी झालं असलं, तरीही मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे मुंबई, ठाण्यासारख्या महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला…

MNS-Thackeray faction alliance in municipal elections - Sanjay Raut's claim
मुंबई, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसे-ठाकरे गट युती- संजय राऊत यांचा दावा

राज ठाकरे यांनी मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक मनसे-शिवसेना ठाकरे गट एकत्रित लढण्याबाबत केलेल्या विधानांवर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

Sunil Shukla moves Bombay High Court against Raj Thackeray over Marathi vs non-Marathi row
मराठी – अमराठी वाद; उच्च न्यायालयात राज ठाकरे यांच्याविरुद्ध याचिका

उच्च न्यायालयात याचिका करण्याचे आदेश दिल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी ही याचिका केली आहे.

MNS leader Avinash Jadhav to host celebrity-free Dahi Handi in Thane with unique Govinda talent showcase
ठाण्यात यंदा मनसेच्या दहीहंडीत सेलिब्रिटींची उपस्थिची नसणार; यंदाचे आकर्षण वेगळेच

गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा, ‘ढाक्कुमाकुम’, ‘ढाक्कुमाकुम’ चा सूर उद्या मुंबई, ठाणेसह उपनगरांमध्ये घुमणार आहे.

Raj Thackeray's order to workers to get to work
मुंबईत ताकद फक्त मनसे, शिवसेनेचीच! राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. निवडणुकीकरिता प्रत्येक मतदार यादी तपासून पहाण्याचे आदेश या वेळी राज…

High Court's decision to celebrate Dahi Handi in the backdrop of law and order
भांडुपमध्ये शिवसेना, मनसे कार्यकर्त्यांना दहीहंडीस मनाई; कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा निर्णय

सुरुवातीला भांडुप पोलीस, मुलुंड वाहतूक विभाग आणि अग्निशमन विभागाकडून परवानगी मिळाली असताना अचानक १३ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यास…

Case registered against MNS worker for throwing black paint on the board of Navi Mumbai Airport
नवी मुंबई विमानतळाच्या फलकावर काळे फासल्याने गुन्हा दाखल

सरकारी मालमत्तेचे नूकसान केल्यामुळे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्याकडे बुधवारी पनवेल महापालिकेच्या कर्मचा-यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ४…

Mahavikas Aghadi march at Panvel Municipal Corporation headquarters
अन्यथा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखू; पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा इशारा

बुधवारी पनवेल महापालिकेच्या मुख्यालयावर असंख्य कार्यकर्त्यांसह मोर्चा काढून महाविकास आघाडीने पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या