मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर बरोबर तीन महिन्यांनी त्यांच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेल्या शरद यादव यांचं निधन झालं. मुलायम सिंह यादव, शरद यादव हे दोघंही राममनोहर लोहिया यांच्या पठडीत तयार झालेले नेते. १९९० च्या दशकात उत्तर भारताच्या राजकारणात बदल घडवणाऱ्या मंडल आयोगाचे प्रतिनिधी हे दोन्ही नेते होते. मुलायम सिंह यादव यांनी १९६० च्या दशकात राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. समाजवादाचा तेव्हा हिंदी भाषिक प्रांतावर चांगलाच पगडा होता. शरद याव हे जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून पुढे आलेलं नेते होते. राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रवेश होणं ही एक नाट्यमय घटना होती. १९७४ च्या उत्तरार्धात झालेल्या पोटनिवडणुकीत जबलपूर लोकसभेची जागा त्यांनी जिंकली होती. तो काळ असा होता ज्या काळात इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाने काँग्रेसवर पकड घेतली होती. तर विरोधी पक्ष हे डळमळीत झाले होते.

बिगर काँग्रेसवादाचा जन्म
विरोधी पक्ष मजबूत होण्यासाठी त्यावेळी समाजवादी कार्यकर्ते मधू लिमये यांनी एक लेख लिहिला होता. शरद यादव यांनी पोटनिवडणुकीत मिळवलेला विजय ही हातावर लागलेली गोळी आहे या आशयाचं वाक्य त्यांनी आपल्या लेखात वापरलं होतं. तर जय प्रकाश नारायण यांनी स्वतःही या विजयाचं जंगी स्वागत केलं होतं. एवढंच नाही तर हा जनतेचा कौल आहे असंही ते सांगायला विसरले नाहीत. आपलं आंदोलन जेपींना आणखी तीव्र करायचं होतं.

amravati lok sabha seat, Navneet Rana, Ravi Rana, Abhijeet Adsul , Support from Abhijeet Adsul, Lok Sabha Election, Navneet Rana visited Abhijeet Adsul home, Navneet Rana and Ravi Rana, amravati news, lok sabha 2024, poitical news,
मनधरणीचे प्रयत्न… नवनीत राणा यांनी अभिजीत अडसूळ यांची घेतली भेट, पण…
sonam wangchuk china march
सोनम वांगचुक यांचा मोठा दावा; म्हणाले, “चीननं भारताचा मोठा भूभाग…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री

इंदिरा गांधी या हुकूमशाही पद्धतीने वाटचाल करत आहेत आणि त्यांचं सरकार हे न्याय देणाऱ्या संस्थांनाही लक्ष्य करतं आहे, लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतं आहे असं जय प्रकाश नारायण हे त्यांच्या भाषणांमधून सांगत होते. एवढंच नाही तर हे जे वातावरण आहे त्या विरोधात सगळ्या विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे असंही आवाहन जयप्रकाश नारायण यांनी केलं. याच कालावधीत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यानंतर २१ महिन्यांनी म्हणजेच १९७७ मध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसची केंद्रातली सत्ता गेली. जनता पक्ष इतर पक्षांसोबत युती आणि आघाडी करत सत्तेवर आला. इंदिरा गांधी यांनी घेतलेला आणीबाणीचा निर्णय जनक्षोभ आणि काँग्रेस विरोधी वातावरण निर्मितीस पुरक ठरला. जयप्रकाश नारायण यांनी या विरोधात उभी केलेली चळवळ ही जनता दलाला सत्तेपर्यंत नेऊ शकली. पण अंतर्गत विरोधाभासामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही. मात्र या गोष्टीमुळे एक महत्त्वाची बाब घडली ती म्हणजे काँग्रेसची सत्तेवरची मक्तेदारी संपुष्टात आल्याचं राजकीय इतिहासाने पाहिलं. राममनोहर लोहिया यांनी १९५० च्या दशकात काँग्रेस विरोधी राजकारणाचा पाया रचला होता त्याचा कळस १९७७ च्या जनता दलाच्या विजयात दिसला.

राममनोहर लोहिया यांनी घेतलेली काँग्रेस विरोधी भूमिका ही फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी नव्हती. तर राजकीय संस्कृती काँग्रेस पाळत नसल्याने ही भूमिका त्यांनी घेतली होती. राममनोहर लोहियांचं हे म्हणणं होतं की ज्या काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळींचा इतिहास सांगून समाजतल्या एका मोठ्या वर्गावर अधिराज्य गाजवलं. पंडित नेहरू यांच्याभोवती केंद्रीत असलेल्या काँग्रेसने इंग्रजी भाषा शिकण्यासारख्या गोष्टी सुरू ठेवल्या महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या आदर्शांच्या विरोधातलं हे धोरण होतं. कारण यामुळे समाजतला एक वर्ग सुशिक्षित झाला पण मागा आणि अनुसुचित वर्गासह ज्यांच्यावर अन्याय होतो आहे असाही एक वर्ग निर्माण होण्यास सुरूवात झाली. राममनोहर लोहिया यांनी महात्मा गांधी यांचं स्वराज्य आणि सर्वोदय तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कट्टर जातीविरोधी दृष्टीकोन हे अंगिकारले. मुलायम सिंह असोत किंवा शरद याव असोत या सगळ्यांना लोहियांमध्ये त्यांचे गुरू दिसले यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. जात, धर्म मानणाऱ्या समाजातल्या अभिजात वर्गाचं वर्चस्व मोडून काढायचं असेल तर मागास वर्गांना पुढे यावं लागेल हा विचार रूजला आणि वाढलाही. राममनोहर लोहिया यांच्या विचारांच्या मुशीत अनेक राजकारणी घडले. मात्र एक विसरता येणार नाही की पुढे जाऊन लोहियांच्या मुशीत घडलेले राजकारणी आणि जनता परिवार अभिमन्यूसारखे संपले. कारण काँग्रेसने निर्माण केलेल्या निवडणुकीच्या राजकारणाच्या चक्रव्युहात ते अडकले. संघ परिवाराने वैचारिक दृष्ट्या नव्या राजकीय चक्रव्युहाची रचना केली मात्र तेही यातून बाहेर पडू शकले नाहीत. शरद यादव यांनी १९९० मध्ये असं मत मांडलं होतं की मंडल हा कमंडलचा विरोध करणारा आयोग आहे. मात्र १९९९ ला शरद यादव हे वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. एवढंच काय जॉर्ज फर्नांडिस हेदेखील वाजपेयी सरकारचा भाग होते. एनडीएचे घटकपक्ष होण्यासाठी या सगळ्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली.

या सगळ्या गोष्टी घडताना मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव या दोघांनी उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये जातीय राजकारणा विरोधात वैचारिकतेची मोट बांधली. मात्र हिंदू सांप्रदायिकतेचा उदय हे दोघंही रोखू शकले नाहीत. या सगळ्यात मंडल ही स्वतःची राजकीय संस्कृती निर्माण करण्यात अपयशी ठरले. तामिळनाडूत द्रविडियन चळवळीने आणि पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये जे डाव्यांनी जे केलं ते या सगळ्या लोहियांच्या शिष्यांना जमलं नाही. जनता परिवाराच्या राजकारणानेच अशी वळणं घेतली की त्यामुळे राममनोहर लोहिया अपयशी ठरले असं म्हणता येईल. त्यामुळेच आज राममनोहर लोहिया यांचा वारसा सांगणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये लोहियांचा विचार दिसत नाही.