scorecardresearch

नाशिक न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
उध्दव ठाकरे गटातून आलेल्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून….

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की नाही, हे निश्चित नसल्याने स्वबळ आजमविण्याची वेळ आल्यास तयारीत राहण्यासाठी…

Niphad Sugar Factory news in marathi
…अन्यथा निफाड साखर कारखान्यासमोर आत्महत्या…कोणाचा इशारा ?

जोपर्यंत कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये देणे आणि सभासदांच्या ठेवी परत मिळत नाहीत, तोपर्यंत कारखाना विक्री करू दिला जाणार…

devotees visiting Trimbakeshwar Temple
त्र्यंबकेश्वरचा ब्रम्हगिरी खुणावतोय… तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या प्रदक्षिणेसाठी…

सुमारे आठशे वर्षांपूर्वी संत निवृत्तीनाथ महाराज ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला.

River linking sparks regional water conflict in Maharashtra Marathwada alleges water diversion in Nashik Ahilyanagar corridor
प्रस्तावित नदीजोड प्रकल्पांतील पाण्याची आतापासून पळवापळवी ? नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा यांच्यात स्पर्धा

राज्य सरकारने नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी पाऊल टाकले असताना भविष्यात उपलब्ध होणारे पाणी आपापल्या भागात वळविण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली…

Bhavali Dam news in marathi
भावली धरणातील पाण्याच्या लाटा…शहापूर विरोधातील नौकेत हेमंत गोडसेंसह शिवसेनेचे पदाधिकारी   

भावली धरणाची पाणी साठवण क्षमता १४३४ दशलक्ष घनफूट आहे. सततच्या पावसामुळे सध्या भावली धरण तुडुंब भरले आहे.

District Transporters union news in marathi
नाशिक : अवजड वाहतुकीवरील निर्बंधामुळे पेच; जिल्हा वाहतूकदार संघटनेची नाराजी

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांविषयी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणील संघटनेच्या वतीने करण्यात आली.

Sambhaji Bhide new controversial statement on pantheism
सर्वधर्मसमभाव म्हणजे षंढपणा, ढोंगीपणा…संभाजी भिडे काय बोलून गेले ?

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर १५ ऑगस्टला भगवा फडकविण्यासाठी एकसंघ व्हावे, असे आवाहनही संभाजी भिडे यांनी केले.

Nashik District Bank news
नव्या कर्ज परतफेड योजनेमुळे नाशिक जिल्हा बँकेवरील संकट टळणार का ? पहिल्या दिवशी तिजोरीत किती भरणा झाला ?

थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने सुरू केलेली नवीन कर्ज परतफेड योजना ही राज्यातील सर्वोत्तम योजना असल्याकडे बँकेचे प्रशासक तथा विभागीय…

Over 3500 patients provided financial assistance from Chief Minister s Relief Fund
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साडेतीन हजार रुग्णांना मदत… नाशिक विभागात ३२ कोटींचे वाटप

नाशिक विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध करत मागील सात महिन्यांत ३५४२ रुग्णांना ३२ कोटी ३२ लाख पाच हजार रुपयांची वैद्यकीय मदत…

notorious criminals Externed From Nashik
गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर… तडिपारीच्या कारवाईला वेग

शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जनतेच्या जिवित व मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने पोलिसांकडून दोन किंवा अधिक गुन्हे…

संबंधित बातम्या