नवी मुंबई

नवी मुंबई (Navi Mumbai) हे महाराष्ट्रातील पहिले नियोजनबद्ध शहर असून त्याचे क्षेत्रफळ १६४ चौरस किलोमीटर आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता महाराष्ट्र सरकारने जुलै १९५८ रोजी नवी मुंबई (Navi Mumbai City) हे नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याची जबाबदारी सिटी अॅण्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉपरेरेशन अर्थात सिडकोकडे देण्यात आली. सिडकोनेही वाणिज्य, रोजगार, दळणवळण, व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि इतर पायाभूत सुविधांनी सुसज्य असे शहर वसवले. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वे ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.
त्या दृष्टीने सिडकोने भारतीय रेल्वेबरोबर करार करत नवी मुंबईत रेल्वेचे जाळे निर्माण केले. आज मानखुर्द-पनवेल आणि ठाणे-तुर्भे रेल्वे मार्गावर लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. आज राज्याच्या विकासात नवी मुंबई हे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Read More
bird numbers in Uran dropped over one lakh due to declining wetlands say environmentalists
पाणथळींवरील पक्षीसंख्येत घट, पक्षीसंख्या एक लाखाने घटल्याची भीती, पाणी आणि पाणथळ कमी झाल्याने अन्नाच्या शोधत पक्ष्यांची भटकंती

विविध कारणांनी उरणमधील अनेक पाणथळींची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या दोन ते अडीच लाख पक्ष्यांच्या संख्येत घट होऊन…

Parents protest against nerul school over child abuse demand to make school principal co accused
मुलावरील अत्याचाराविरोधात पालकांचे आंदोलन, शाळेच्या मुख्याध्यापकांना सहआरोपी करण्याची मागणी

नेरुळ येथील एका शाळेत चार वर्षांच्या बालकावर बसचालकाकडून यौन शोषण केल्याचा आरोप करत सलग दुसऱ्या दिवशी पालकांनी निदर्शने केली. या…

Navi Mumbai Municipal Corporation fined five businesses 50 000 for damaging trees with illegal lighting installations
वृक्षांवर विद्युत रोषणाई करणाऱ्यांवर कारवाई, पाच हॉटेलांसह दुकानांकडून ५० हजार दंड वसूल

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृक्षांवर खिळे ठोकून रोषणाई केली जाते. याबाबत पालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पाच…

Beggars near seawoods railway Station cause fear officials and police hesitate to take action
सीवूड्समध्ये फुकटात घर! रेल्वे स्थानकासमोर भिकाऱ्यांच्या टोळ्यांचे मोकाट बस्तान

सीवूड्स स्थानकाच्या पश्चिमेकडील पुलाच्या खालील पदपथांवर चक्क संसार मांडून बसलेल्या भिकाऱ्यांची दहशत इतकी वाढली आहे की, महापालिका आणि पोलीस यंत्रणाही…

detail information about Navi Mumbai School Case
Navi Mumbai School Case: बस चालकाकडून मुलावर अत्याचार, मुख्याध्यापकांवरही कारवाईची मागणी

नवी मुंबईतील एका शाळेत शिकणाऱ्या ४ वर्षाच्या मुलावर बस चालकाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी घडली. या…

Navi Mumbai, Muslim community condemns ,
नवी मुंबई : पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा मुस्लिम समाजाने केला निषेध 

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे फिरण्यास गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात २७ जणांचा  मृत्यू झाला होता.

Allotment papers for CIDCO houses in Navi Mumbai Bamandongri will be given to the winners from Monday
बामणडोंगरीतील सिडकोच्या घरांचे वाटपपत्र सोमवारपासून

सोडतधारकांनी सदनिका मिळविण्याची विहित प्रक्रिया पूर्ण केली आणि ज्या गृहप्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झाले अशा सोडतधारकांना टप्प्याटप्प्याने सिडको घरांचे वाटप पत्र…

Navi Mumbai: Father commits suicide by shooting himself in the head out of depression after son gets involved in drug trafficking
मुलगा अमली पदार्थ तस्करीत अडकल्याने पित्याने केली आत्महत्या 

मुलगा अमली पदार्थ तस्करी रॅकेट मध्ये अडकल्याने त्यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केली असल्याचल अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

The Jewel of Navi Mumbai area along Palm Beach is also seeing a surge in flamingos
फ्लेमिंगोंची ज्वेल ऑफ नवी मुंबईलाही पसंती

डीपीएस तलावातही फ्लेमिंगो येऊ लागले असताना या परदेशी पाहुण्यांची पामबीच किनारी असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरालाही फ्लेमिंगोंची पसंती पाहायला…

Nerul police take action against two minors who stole 13 bikes
१३ दुचाकी चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर कारवाई; गुन्हे प्रकटीकरण पथकासह नेरुळ पोलिसांचे यश

नवी मुंबई आयुक्तालयातील ११ व मुंबई आयुक्तालयातील एका गुन्ह्याची उकल करण्यात नेरुळ पोलिसांना यश आले आहे.

Chief Minister urges for multiple routes to Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बहुपर्यायी मार्गांसाठी मुख्यमंत्री आग्रही; रस्ते, मेट्रो, जलवाहतुकीने विमानतळ जोडण्याच्या सिडकोला सूचना

बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेबरोबर रोजगारनिर्मिती, सौर ऊर्जेचा वापर, अशा शहरांच्या निर्मितीची गरज असून या निर्मितीत सिडकोची भूमिका महत्त्वाची आहे.

संबंधित बातम्या