ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.
राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.
आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.Read More
Pakistan Jaffar Express Attacked : पाकिस्तानमधील बंडखोर संघटना बलूच रिपब्लिकन गार्ड्सने जाफर एक्सप्रेसमध्ये मोठा स्फोट घडवून आणला असून यामुळे एक्सप्रेसचे…
रशिया-पाकिस्तानदरम्यान झालेल्या या व्यापार करारावरून भारतातील विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका करणे अनाठायी असल्याचे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
P&G Discontinued Business In Pakistan: इस्लामाबादमधील इंजिनिअर जावेद इक्बाल यांनी गेल्या तीन महिन्यांपासून बाजारात त्यांचा आवडता जिलेट रेझर मिळाला नाही…