राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पुढारी आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांच्या कन्या आहेत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हेदेखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत.


शिवसेनेत असताना भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि जाहिर सभांमधून राज ठाकरेंनी आपल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली. शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर त्यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाची स्थापना केली. मनसेची स्थापना होताच, परप्रांतियांचे राज्यात येणारे लोंढे, भूमिपुत्रांचे हक्क, मराठी भाषेला प्राधान्य, रेल्वेमध्ये होणारी उत्तर भारतीयांची नोकरभरती, मुंबईच्या समुद्रकिनारी होणारी छठपुजा या मुद्द्यांवरून जोरदार रणशिंग फुंकले.

मनसेने टोल विरोधात छेडलेले आंदोलनही लक्षवेधी ठरले. तसेच मशिदीवरील लाऊडस्पीकर आणि मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने आक्रमक आंदोलन केले. राज ठाकरेंच्या आक्रमक आणि स्थानिक मुद्द्यांच्या राजकारणामुळे २००९ साली विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. मात्र त्यानंतर पक्षाला गळती लागत २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंना केवळ एक आमदार निवडून आणता आला.


राज ठाकरेंनी वेळोवळी घेतलेल्या राजकीय भूमिका अनेकदा वादात अडकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मनसेचे उमेदवार उभे केले, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार केला. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अधिकृतरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महायुतीचा घटक होणे पसंत केले. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.


Read More
Gulabrao Patil Raj Thackeray controversy
राज ठाकरे दहशतवाद्यांना शोधायला पाकिस्तानात जातील : गुलाबराव पाटील यांची टीका

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरूवारी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची पाहणी केली.

Amit Thackeray and Raj Thackeray
Amit Thackeray: “माझ्या वडिलांचा सल्ला ऐकला असता तर आज…”, अमित ठाकरेंनी बोलून दाखवली ती खंत फ्रीमियम स्टोरी

Amit Thackeray: आपल्या वडिलांनी दिलेला सल्ला आपण ऐकला नाही, असे विधान अमित ठाकरे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केले.

Shiv sena Shinde group leader Gulabrao Patil
Maharashtra News Highlights : “सौ चुहे खाके, बिल्ली…”, अजित पवार गटात होणाऱ्या पक्षप्रवेशाबाबत गुलाबराव पाटलांचे विधान

Marathi News Highlights : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा…

Raj Thackeray Devendra Fadnavis
Operation Sindoor : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “राज ठाकरे ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले त्याला फारसं महत्त्व नाही, देश..”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युद्ध हा पर्याय नाही असं म्हटलं आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी उत्तर…

Raj Thackerays appeal to the central government
Raj Thackeray on Air Strike: “कोम्बिंग ऑपरेशन करा”, राज ठाकरेंचा केंद्र सरकारला आवाहन

मोदी सौदीचा दौरा सोडून बिहारमध्ये प्रचारासाठी गेले, केरळमध्ये अदाणींच्या पोर्टचं उद्घाटन केलं. मग वेव्हजच्या कार्यक्रमाला गेले. परिस्थिती एवढीच गंभीर होती…

Raj Thackeray addressing the media after Operation Sindoor, commenting on India's response to terrorism
Operation Sindoor: “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं”, ऑपरेशन सिंदूरनंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया फ्रीमियम स्टोरी

Operation Sindoor News Updates: भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर देशभरातून समाधन व्यक्त केले जात आहे. दरम्यान भारताने दिलेल्या या प्रत्युत्तराचे सर्वसामान्यांसह…

Raj Thackerays reaction to Operation Sindoor
Raj Thackeray:”पाकिस्तान आधीच बरबाद झालाय…”; ऑपरेशन सिंदूरवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. “दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं!”, असं राज ठाकरे…

raj thackeray
योग्य पुनर्वसनाशिवाय इमारती रिकाम्या करु देणार नाही – राज ठाकरे; प्रभादेवी पुलाच्या वादात मनसेची उडी

अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी-वरळी उन्नत रस्त्याअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील सध्याचा १२५ वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून त्याजागी नवीन…

Raj Thackeray Elphiston Bridge
Elphiston Bridge : “घरे तोडायला येणाऱ्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या”, ‘एल्फिस्टन’बाधितांनी घेतली मनसे प्रमुखांची भेट!

मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या पुलाचे काम हाती घेण्यात आले असून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल (डबलडेकर) बांधण्यात येणार आहे.…

Uddhav Thackery and Raj Thakceray
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? प्रकाश अकोलकर यांचं उत्तर नेमकं काय?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं समीकरण पाहण्यास मिळू शकतं.

संबंधित बातम्या