समांथा रुथ प्रभू

समांथा रुथ प्रभू ही सध्याची दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला होता. तिचे वडील तेलुगू आणि आई मल्याळम भाषिक आहेत. तिला दोन मोठे भाऊ आहेत. समांथा तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा तिन्ही भाषा उत्तमपणे बोलते. चेन्नई शहरामध्ये तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. स्टेला मॅरिस कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली आहे. पदवीचे शिक्षण सुरु असताना समांथाने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. काही वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम करायची संधी मिळाली. २०१० मध्ये तिचा ‘ये माया चेसवे’ (ye maaya chesave) हा पहिला तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तिच्यासह नागा चैतन्य अक्किनेनी प्रमुख भूमिकेत होता. याच वर्षी तिने तमिळ सिनेसृष्टीदेखील पदार्पण केले. तिने इगा, रंगस्थलम, सुपर डिलक्स अशा अनेक दर्जदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्य देखील नेहमी चर्चेत राहिले. २०१० पासून समांथा आणि नागा चैतन्य एकमेकांना डेट करत होते. सहा-सात वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये गोव्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. यानंतर तिने ‘समांथा अक्किनेनी’ या नावाचा वापर करायला सुरुवात केली. जुलै २०२१ मध्ये तिने सोशल मीडियावरुन ‘अक्किनेनी’ नाव काढून टाकले. यामुळे चाहत्यांना या जोडप्यामध्ये काहीतरी बिनसल्याची शंका आली. पुढे ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. या घटस्फोटामुळे समांथा पुन्हा चर्चेत आली. यावरुन तिच्यावर टीका देखील झाली. दरम्यानच्या काळात ‘पुष्पा’ आणि ‘द फॅमिली मॅन सीझन २’ या दोन कलाकृतींमुळे समांथाच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. काही महिन्यांपूर्वी तिने सोशल मीडियावर मायोसायटीस हा गंभीर आजार झाला असल्याची माहिती दिली.Read More
Fan built Samantha Ruth Prabhu temple dedicated in Andhra Pradesh on her 38th birthday
Video: जबरा फॅन मुमेंट! समांथा रुथ प्रभूच्या चाहत्याने बांधलं तिचं मंदिर अन्…; पाहा व्हिडीओ

Samantha Ruth Prabhu Temple: चाहत्याने समांथा रुथ प्रभूचा ३८वा वाढदिवस ‘असा’ केला साजरा

Samantha Ruth Prabhu calls ex husband Naga Chaitanya Handsome
9 Photos
समांथा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यला म्हणतेय देखणा, हृतिक रोशनचे लूक पसंत नाहीत; सध्या कोणाला करतेय डेट?

लग्नाच्या ४ वर्षातच समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचे नाते तुटले. या जोडप्याने २०१७ मध्ये लग्न केले आणि २०२१…

Samantha Ruth Prabhu Visits Tirupati Balaji Temple With Raj Nidimoru Amid Dating Rumours
Video: समांथा रुथ प्रभूचं ठरलं? कथित बॉयफ्रेंडबरोबर घेतलं तिरुपती मंदिरात दर्शन, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचा कथित बॉयफ्रेंड कोण आहे? जाणून घ्या…

fees of south actress shining in Bollywood
9 Photos
तमन्ना ते रश्मिकापर्यंत, ‘या’ ५ दाक्षिणात्य सुंदरी बॉलिवूडवर करतात राज्य, चित्रपटांसाठी किती घेतात मानधन?

दीपिका पदुकोण, आलिया भट्ट किंवा कियारा अडवाणी यांच्याव्यतिरिक्त, दक्षिणेतील अभिनेत्रीदेखील बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतात. या यादीत रश्मिका, समांथा सारख्या अभिनेत्रींचा समावेश…

Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”

नागा चैतन्यने समांथा रूथ प्रभूबरोबरच्या घटस्फोटावर केलं भाष्य; म्हणाला, “मला गुन्हेगारासारखं का वागवलं जातंय?”

IMDb's list of the top Indian movie stars of 2024
11 Photos
दीपिका, शाहरुख खान आणि आलियाला मागे टाकत तृप्ती डिमरी ठरली 2024 मधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री, पाहा IMDb ने जाहीर केलेली यादी

2024 मधील सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सची संपूर्ण यादी पहा.

samntha ruth prabhu father died
समांथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन; अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाली…

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन झाल्यानंतर या दु:खद बातमीची माहिती समांथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली.

samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”

‘सिटाडेल: हनी बनी’ या समांथाच्या नुकत्याच आलेल्या वेबसीरिज मध्ये तिने आईची भूमिका केली असून तिने एका मुलाखतीत मातृत्वावर भाष्य केलं…

Citadel Honey Bunny release Amazon Prime
9 Photos
४० कोटी रूपये बजेटच्या सिरीजमध्ये वरुण व समांथा मुख्य भूमिकेत, ‘सिटाडेल: हनी बनी’साठी घेतले ‘इतके’ मानधन

Citadel: Honey Bunny : ;सिटाडेल: हनी बनी ही राज आणि डीके दिग्दर्शित अमेरिकन स्पाय-थ्रिलर सिटाडेलची भारतीय रिमेक वेबसिरीज आहे. यामध्ये…

alia bhatt praises samantha
“पुरुषप्रधान जगात स्त्री म्हणून…”, आलिया भट्टच्या तोंडून कौतुकाचे ‘ते’ शब्द ऐकताच समांथाचे डोळे पाणावले; व्हिडीओ व्हायरल

हैदराबादमध्ये ‘जिगरा’ सिनेमाच्या प्री-रिलीज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समांथाने उपस्थिती लावली होती.

meet south actress who rejected srk film once struggle for food
एकेकाळी जेवणासाठी पैसे नव्हते; स्टार झाल्यावर शाहरुखचा ब्लॉकबस्टर सिनेमा नाकारला, आज ‘ही’ अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

५०० रुपये पहिला पगार ते कोट्यवधींची मालकीण! मेहनत व संघर्षाच्या जोरावर ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री आज आहे सुपरस्टार

संबंधित बातम्या