बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty). शिल्पाचं व्यावसायिक तसेच खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. ८ जून १९७५मध्ये शिल्पाचा जन्म झाला. अभिनयाची आवड असलेल्या शिल्पाने बाजीगर चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर तिने अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, दस, रिश्ते, फिर मिलेंगे, परदेसी बाबू, ओम शांती ओम, दोस्ताना, लाईफ इ अ मेट्रो, जंग, कर्ज, रिश्ते, आग, छोटे सरकार यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये शिल्पाने उत्तम काम केलं. सुपर डान्सर, इंडियाज गॉट टॅलेंट या छोट्या प़डद्यावरील रिअॅलिटी शोमच्या परीक्षकपदी शिल्पा होती. बिग ब्रदर या शोची ती विजेती देखील आहे. हंगाम २ चित्रपटाच्या निमित्ताने तिने १४ वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. २२ ऑक्टोबर २००९मध्ये शिल्पाने उद्योगपती राज कुंद्राशी (Raj Kundra)लग्नगाठ बांधली. शिल्पाला विवान व समीक्षा अशी दोन मुलं आहेत.Read More
Decisions Of Mumbai High Court: ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी सुरू असलेल्या या सेलिब्रिटी जोडप्याने परदेशात प्रवास करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध…