scorecardresearch

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
 Sion Kolivada Former Shiv Sena corporator Ramdas Kamble joins Eknath Shindes Shiv Sena faction
माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पक्ष प्रवेशानंतर सायन कोळीवाडा शाखेजवळ तणाव

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या सायन कोळीवाडा परिसरातील दुसरा नगरसेवकही शिंदे यांच्या पक्षात गेल्यामुळे येथील शिवसैनिकांना धक्का बसला आहे.

Shiv Sena favors Shinde group for party entry in Yavatmal district
शिवसेनेत कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’ जोरात; तीन माजी नगराध्यक्ष…

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भविष्यातील राजकीय स्थैर्याची चाचपणी करून विविध पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे…

कल्याणमध्ये शांतीदूत सोसायटीच्या विकासकावरून शिवसेना आमदार आणि भाजप माजी आमदारामध्ये जुंपली

तेरा वर्षापासून रहिवासी आपला प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. मागील ४६ महिन्यांपासून त्यांना विकासकाने भाडे दिले नाही, अशी माहिती…

mahayuti constituent parties clash over power sharing unity and mutual support
महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वयाचे केंद्र ठरतंय…

महायुतीचे तीन मुख्य घटक पक्ष निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करतेवेळी मुख्यमंत्रिपद व इतर खाते यावरून बराच विलंब व रुसवे फुगवे झाल्याचा…

congress Prithviraj Chavan statement on hindusum proteste in Solapur
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा सोलापुरात निषेध, युवा सेनेतर्फे आंदोलन

‘भगवा दहशतवाद’ असे संबोधण्याऐवजी ‘सनातन दहशतवाद’ असे म्हणा असे विधान करणारे काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक…

11 office bearers of Shinde's Shiv Sena in Solapur also resign
सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेतील ११ पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी पक्षातील वाढत्या गटबाजीला कंटाळून अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर…

cm fadnavis dadagiri remark on pune industry sparks political reactions pune
दादागिरीवरून राजकीय चर्चेचा धुरळा – पुण्याच्या उद्योगक्षेत्रावरील दबावाच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर प्रतिक्रिया

‘उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वांत मोठा अडथळा आहे,’ असे विधान मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पुण्यात केले होते.

Political movement over my word Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘सनातनी दहशतवाद’ वक्तव्याचा निषेध; कराडमध्ये युवासेनेकडून घोषणाबाजी

‘सनातनी दहशतवाद’ असा उल्लेख करून पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या विचारसरणीचा अपमान केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची इच्छा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे माणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.

Shiv Sena Shinde group protested in nagpur against Prithviraj Chavan
माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात शिंदे सेनेचे आंदोलन; भगवा, हिंदुत्व आणि सनातन यावर वादग्रस्त विधान

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘हिंदू दहशतवाद’ या विषयावर केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी नागपुरात शिवसेनेने (शिंदे…

Kedar Dighe warns the government against the free accident insurance scheme for dahihandi
Dahihandi News : “…तर गोविंदांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू..”, विमा योजनेवरून केदार दिघेंचा शासनाला इशारा

ठाणे शहराला दहीहंडी उत्सवाची नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात दहीहंडीनिमित्ताने लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येतात.

संबंधित बातम्या