scorecardresearch

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Satara eknath shinde criticizes opposition Lost Public Trust misinformation Koyna Backwater Festival
“जनतेने तुम्हाला उचलून फेकले!” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर कडवट टीका

Eknath Shinde : विरोधक पराभवाने पछाडले असून लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात घणाघात केला.

Mumbai ST Bank Co-Operative Meeting
Mumbai ST Bank : गुणरत्न सदावर्तेंच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; एसटी बँकेच्या कार्यालयात राडा

Mumbai : गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना (शिंदे) यांच्या कार्यकर्त्यांममध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

jalgaon zp reservation reshuffle changes political equations patil deokar Son Political Future
Jalgaon Zp Election: गुलाबराव पाटील–गुलाबराव देवकर यांच्यात पूत्र प्रेमापोटी पुन्हा सामना?

युती न झाल्यास, जळगाव ग्रामीणमध्ये पाळधी गटातील आरक्षण बदलामुळे गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात पुत्र प्रेमापोटी पुन्हा लढत होण्याची…

Sachin Kote Jagdish Chaudhary elected as Thackeray group Nagar North District President
ठाकरे गटाच्या नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी सचिन कोते, जगदीश चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) उत्तर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करीत दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली आहे.

shiv sena shinde
शिंदे गटाच्या आमदाराचे बंड… पाचोरा–भडगावमध्ये स्वबळावर निवडणुका लढणार !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती व्हावी म्हणून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील एकीकडे भाजपला गळ घालत आहेत. तर…

Ganesh Naik news
Ganesh Naik : गणेश नाईकांवर शिंदे सेनेची पुन्हा टीका… ते बिबटे कुठे गेले याचा तपास करणार

वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेले अनेक दिवसांपासून कलगितुरा सुरु आहेत.

rajan vichare golden gang looted thane
गोल्डन गँगने ठाणे महापालिकेला लुटून खाल्ले, राजन विचारे यांचा गंभीर आरोप

या लोकांनी संपूर्ण महापालिका लुटून खाल्ली आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केला.

kisan kathore
किसन कथोरे यांच्या मुरबाडमध्ये शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन, जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेची रणनीती, खासदार श्रीकांत शिंदेंचा दौरा

सध्या पालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही राजकीय वातावरण तापू लागले आहे.

Minister of State Ashish Jaiswal statement regarding Deputy Chief Minister Eknath Shinde work
Eknath Shinde: एकनाथ शिंदे चोवीस तास काम करतात, कधी झोपतच नाही; शिवसेनेच्या मंत्र्याचा अजब दावा, पंतप्रधान मोदींनंतर आता…

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ तास काम करतात. आता ते प्रयोग करतायत. ज्यात त्यांना झोपावे लागणार नाही. अशी साधना ते करत…

nashik police crackdown political criminals eknath shinde shiv sena faces trouble pawan pawar case
“मोठे लोक आमच्याकडे येतात, ओजीवाले गँगस्टर…” एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पवन पवारमुळे कोंडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पूर्णपणे मोकळीक दिल्याने नाशिक पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांना सळो की पळो करुन सोडले आहे.

Shiv Sena (Shinde faction) MP Naresh Mhaske criticizes Rajan Vicharen over the upcoming anti-corruption march in Thane
“ज्यांना दिघे साहेबांनी भ्रष्ट ठरवलं, तेच आज भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढतात ”, खासदार नरेश म्हस्के यांची राजन विचारेंवर टीका

ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या