सनी देओल यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी पंजाबमध्ये झाला. एक बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते असून १७व्या लोकसभेचे सदस्य देखील आहेत. सनी देओल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. १९८३ साली त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. यावर्षी त्यांचा पहिला चित्रपट ‘बेताब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. धरम प्राजी का पंजाबी पुत्तर म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख मिळविलेल्या सनी देवोल यांनी स्वबळावर सिनेसृष्टीत आपले स्थान पक्के केले आहे. गेल्या 25 वर्षात विविध भूमिकांमधून दमदार अभिनय करून सनी यांनी आपला स्वतःचा असा खास प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्याचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्या-त्या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले.Read More
Bollywood patriotic movies, independence day 2025 celebrations: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत.…