scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

कसोटी क्रिकेट

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
PM Modi Letter to Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara: “तू कसोटी क्रिकेटचे सौंदर्य जिवंत ठेवले”, पंतप्रधान मोदींचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर पत्र

PM Modi To Cheteshwar Pujara: पंतप्रधानांच्या या पत्राला उत्तर देताना पुजाराने म्हटले आहे की, “माझ्या निवृत्तीबद्दल आपल्या माननीय पंतप्रधानांकडून कौतुकाचे…

New Zealand Beat Zimbabwe by an Innings and 359 Runs 3rd Highest Test match win
NZ vs ZIM: न्यूझीलंडचा झिम्बाब्वेवर एक डाव आणि ३५९ धावांनी ऐतिहासिक विजय, ६७ वर्षे जुना विक्रमही मोडला

SA vs ZIM: झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली गेली. न्यूझीलंडने दुसरा कसोटी सामना एक डाव आणि ३५९ धावांनी…

Ind vs Eng handshake controversy what sachin tendulkar says
IND vs ENG: “ती भारताची अडचण…”, बेन स्टोक्स-जडेजामधील हस्तांदोलन वादावर सचिन तेंडुलकरची मोठी प्रतिक्रिया

Sachin Tendulkar on Handshake Controversy: इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारतीय फलंदाजांमध्ये झालेल्या हस्तांदोलन वादावर आता सचिन तेंडुलकरने…

mohammed siraj
मोहम्मद सिराजच्या यशाची त्रिसूत्री- आईची रोज प्रार्थना, वडिलांच्या कबरीला भेट आणि रोनाल्डोचे सामने

इंग्लंड दौऱ्यावर दमदार कामगिरी करत मोहम्मद सिराजने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

भारतीय क्रिकेट संघानं इंग्लडविरोधात ओव्हल येथे खेळलेला कसोटी सामना ६ धावांनी जिंकला आहे.
Shashi Tharoor : “माझे शब्द…”, टीम इंडियावर शंका घेणाऱ्या शशी थरूर यांनी मागितली माफी; इंग्लंडविरोधातील विजयानंतर केली खास पोस्ट

भारतीय क्रिकेट संघानं इंग्लडविरोधात ओव्हल येथे खेळलेला कसोटी सामना ६ धावांनी जिंकला आहे.

Asaduddin Owaisi Praise For Mohammed Siraj after India big test win against England Oval test
Mohammed Siraj : “पुरा खोल दिए पाशा!”, ओव्हल कसोटीतील सिराजच्या कामगिरीवर ओवैसी खूश; हैदराबाद स्टाईल पोस्ट चर्चेत

भारताच्या कसोटी क्रिकेटमधील विजयावर असदुद्दीन ओवैसी यांनी अस्सल हैदराबादी प्रतिक्रिया दिली आहे.

Team india
Ind vs Eng: ओव्हलवरच्या टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचे ५ शिलेदार फ्रीमियम स्टोरी

दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर भारतीय संघाने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर ६ धावांनी थरारक विजय मिळवला.

Harry Brook Wicket His Bat Slips From Hand Caught Out on Akashdeep Bowling Video
IND vs ENG: हवेत बॅट उडाली अन् विकेट पडली! हॅरी ब्रूक ऋषभ पंतच्या स्टाईलमध्ये झाला बाद; Video पाहिला का?

Harry Brook Wicket: हॅरी ब्रूकने शतकी खेळी करत भारतापासून सामना दूर नेण्याचा प्रयत्न करत होता. पण आकाशदीपच्या चेंडूवर ब्रूकने आपली…

Team India World Record For Most Boundaries in Test Series
IND vs ENG: ४७० पार! टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटी मालिकेत अशी कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

India World Record: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. यासह संघाने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

Sai Sudharsan Gives Befitting Reply to Ben Stokes Who Might Tease Him After Getting Out Video
IND vs ENG: साई सुदर्शनशी पंगा घेणं डकेटला पडलं महागात, ड्रेसिंग रूममध्ये जाताना मागे फिरला अन् असं उत्तर दिलं की…, VIDEO

Ben Duckett Sai Sudharsan Fight Video: ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस बेन डकेट आणि साई सुदर्शन यांच्यात बाचाबाची झालेली पाहायला…

संबंधित बातम्या