scorecardresearch

About Photos

कसोटी क्रिकेट Photos

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
Virat Kohli's 500th International Match
9 Photos
PHOTOS: शतक एक विक्रम अनेक! ५००व्या सामन्यातील खेळीच्या जोरावार विराट कोहलीने रचले विक्रमांचे मनोरे

Virat Kohli 500th Match Record List: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटने आपला ५००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना शतक झळकावले. या…

Ashwin records in matches against West Indies
9 Photos
PHOTOS: रविचंद्रन आश्विनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कहर! १२ विकेट्स घेत लावली विक्रमांची रांग

R Ashwin Records: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात टीम इंडियाने…

IND vs AUS 4th Test: 75th years of India-Australia friendship Modi and Albanese honored by BCCI see photos
9 Photos
IND vs AUS 4th Test: भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण! मोदी आणि अल्बानीज यांचा BCCIकडून सन्मान, पाहा छायाचित्रे

India-Australia Friendship: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पहिल्या…

IND vs AUS 1st Test: Suryakumar Yadav-KS Bharat debut India's Test squad A special appreciation ceremony was attended by family
9 Photos
IND vs AUS 1st Test: सूर्यकुमार यादव-केएस भरत भारताच्या कसोटी ताफ्यात दाखल! खास कौतुक सोहळा पाहण्यसाठी लावली कुटुंबाने हजेरी

India vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला आजपासून सुरुवात झाली असून नागपूर कसोटीत भारताच्या दोन धुरंधरांना पदार्पणाची संधी मिळाली.

Test Cricket Record
12 Photos
Photo: विराट कोहली ते मुथय्या मुरलीधरन… ‘या’ पाच दिग्गजांचे कसोटी क्रिकेटमधील विक्रम मोडणे आहे अशक्य!

Test Cricket Records : कसोटी क्रिकेटमध्ये असे काही विक्रम प्रस्थापित झालेले आहेत, ज्यांची कल्पना करणेही अशक्य आहे.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×