विष्णू विनोद (Vishnu Vinod) हा भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. तो केरळकडून राज्यस्तरीय क्रिकेट खेळतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी अशा काही स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभवही त्याच्याकडे आहे. एप्रिल २०१७ मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये सहभागी होत आयपीएलमध्ये पदार्पण केले.
केएल राहुलच्या जागी त्याला खेळवण्यात आले. त्या वर्षीच्या हंगामामधील ३ सामन्यांमध्ये त्याने १९ धावा केल्या. पुढे तो आरसीबीमधून बाहेर पडला. २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षांमध्ये त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०२१ च्या आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर २०२२ मध्ये तो सनरायझर्स हैदराबादमध्ये गेला.
राज्यस्तरीय पातळीवर चांगली कामगिरी करुनही त्याला खेळणे शक्य झाले नाही. वेगवेगळ्या संघांमध्ये जाऊनही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये त्याला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये सहभागी करण्यात आले. Read More
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने महापालिकेविरोधात सार्वत्रिक संताप व्यक्त केला जात असताना उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी मात्र रस्ते चकाचक करण्यात आले.
Annasaheb Patil Mahamandal, Narendra Patil, Ajit Pawar, Chhagan Bhujbal : अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार…
Devendra Fadnavis : गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १४६८ कोटींच्या भव्य वैद्यकीय व शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन होणार…
विकासकांची फौजदारी कारवाईतून कायमची सुटका करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायदा (मोफा) रद्द करण्याच्या हालचाली पुन्हा सुरु केल्या…