विष्णू विनोद (Vishnu Vinod) हा भारतीय फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे. तो केरळकडून राज्यस्तरीय क्रिकेट खेळतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी अशा काही स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभवही त्याच्याकडे आहे. एप्रिल २०१७ मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघामध्ये सहभागी होत आयपीएलमध्ये पदार्पण केले.
केएल राहुलच्या जागी त्याला खेळवण्यात आले. त्या वर्षीच्या हंगामामधील ३ सामन्यांमध्ये त्याने १९ धावा केल्या. पुढे तो आरसीबीमधून बाहेर पडला. २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षांमध्ये त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. २०२१ च्या आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर २०२२ मध्ये तो सनरायझर्स हैदराबादमध्ये गेला.
राज्यस्तरीय पातळीवर चांगली कामगिरी करुनही त्याला खेळणे शक्य झाले नाही. वेगवेगळ्या संघांमध्ये जाऊनही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये त्याला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये सहभागी करण्यात आले. Read More
संतप्त जमावाने केलेल्या धक्काबुक्कीनंतर गर्भपाताचा आघात सहन कराव्या लागलेल्या महापालिकेच्या महिला प्रभाग अधिकाऱ्याला २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश…
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) यंदाच्या विश्वचषक स्पर्धेपासून उपांत्यपूर्व फेरी रद्द करून ‘क्रॉसओव्हर पूल’ ही दोन टप्प्यांची नवी गटपद्धत लागू केली…
शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या सहकारी सोसायट्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…