यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
स्थानिक जांब मार्गावरील एका हॉटेलमध्ये होत असलेल्या शिवसंकल्प प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची रणनीती शिकविली जाणार आहे.
हातात सरकारविरोधी फलक घेत शेतकऱ्यांनी संविधान चौकात निदर्शने केली. यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान केले.
नगर परिषदेने खातरजमा न करता जुन्या याद्या वापरल्याचा आरोप होत असून, एकाच कुटुंबातील सदस्य विविध प्रभागांमध्ये दाखवल्याने निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर…