13 August 2020

News Flash

बबन मिंडे

तीन वर्षांनंतर वेरुळ महोत्सव

गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळामुळे बंद ठेवण्यात आलेला वेरुळ महोत्सव या वर्षी घेण्यात येणार आहे.

‘सरकार पाडणे किंवा पडणे ही आमची प्राथमिकता नाही’ – ठाकरे

मराठवाडय़ात मुलीच्या लग्नाच्या विवंचनेने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागू नयेत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना शिवसेनेच्या वतीने लागू करीत आहे

मग सर्वच पक्षनेत्यांच्या दौऱ्यांचे कार्यक्रम प्रशासन का जाहीर करत नाहीत

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या वेगवेगळ्या जिल्ह्य़ांच्या दौऱ्यांचे कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्याची नवी पद्धत रुढ झाली असेल तर राज्यातील इतर पक्षांच्या अध्यक्षांचे दौरे प्रशासनाकडून सर्व संबंधितांना कळवावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने येथे केली.

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज ‘उमेद’ मेळावा

बचतगटातील महिलांचा छोटय़ा-मोठय़ा उद्योगाच्या उभारणीसाठी कौशल्यविकास व्हावा, महिलांना बँक व्यवहाराशी जोडून त्यांचे आíथक जीवनमान उंचावे यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड येथे ग्रामविकास विभाग व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोमवारी ‘उमेद’ विभागीय मेळावा होत आहे.

हिवाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

अन्नसुरक्षा योजनेखाली सडलेले धान्य मिळत असेल तर ते घेऊन विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात जा आणि आवाज उठवा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जालना येथे पक्षाच्या आमदारांना देऊन एकप्रकारे अधिवेशनातील शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेचेच संकेत दिले.

‘यशवंतराव थोर राजकारणी आणि तेवढेच साहित्यिकही’

यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व थोर राजकारणी होते तेवढेच थोर साहित्यिकही होते असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

गुजरात ही असहिष्णुतेची प्रयोगशाळाच – देवी

गुजरात सरकारने साहित्यिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा एक नवा उद्योग सुरू केला आहे. लेखकाच्या लेखनाची त्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपीच केली जाते.

नागपूरहून पळालेल्या कुख्यात गुंड पठाणला परभणीत अटक

बलात्कार व खुनाच्या आरोपाखाली नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व नागपूरच्या रुग्णालयातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात फरारी झालेला कुख्यात गुंड महेबुब पठाण यास परभणीच्या रहीमनगर येथील घरात रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.

लातुरातील दुष्काळाची शिवसेना आमदारांच्या पथकातर्फे पाहणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सेनेच्या ८ आमदारांच्या पथकाने शनिवारी जिल्हय़ातील दुष्काळी भागाची पाहणी सुरू केली. उद्याही (रविवारी) ही पाहणी होणार आहे.

परभणीतील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण होणार

शाळेत येणारे प्रत्येक मूल प्रगतच झाले पाहिजे. त्यासाठी मुलांची अध्ययनक्षमता ओळखून अध्यापन करावे, असे प्रतिपादन शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी येथे केले.

लाचखोर कार्यकर्ता जाळ्यात

अस्थिव्यंग विद्यालयातील सात कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना समाजकल्याण अधिकारी कार्यालयातील सामाजिक कार्यकर्ता प्रशांत एकनाथ गायकवाड यास शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले.

राष्ट्रवादीची ३, भाजपची एका नगरपंचायतीत सत्ता

जिल्हय़ातील नगरपंचायत अध्यक्षपद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीत नवाब खान, तर पाटोद्यात मनीषा पोटे व शिरूरमध्ये रोहिदास पाटील यांची वर्णी लागली.

उद्धव ठाकरेंची सभा आता ‘मल्टिपर्पज’च्या पटांगणावर

काँग्रेस पक्षाने येथे नवा मोंढा मदानावर उभारलेल्या व्यासपीठावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या कल्पनेला वेगळे वळण लागल्यानंतर आता ठाकरे यांचा कार्यक्रम शहरातील मल्टिपर्पज हायस्कूलच्या पटांगणावर घेण्याचे निश्चित झाले आहे.

जालन्यात खरीप अनुदानासाठी ३८४ कोटींचा निधी आवश्यक

जिल्हय़ात सर्व ९६९ गावांमधील गेल्या खरिपातील पिकांची पैसेवारी ५०पेक्षा कमी जाहीर झाली. ५ लाख ९७ हजार शेतकऱ्यांचे खरिपाचे नुकसान झाले. यात ४ लाख ९६ हजार कोरडवाहू शेतकरी आहेत.

काँग्रेस-शिवसेनेंतर्गत सौहार्द-सुसंवादाचे पर्व!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी येथे भव्य कार्यक्रम होणार आहे.

लातूरच्या पाणीप्रश्नी सर्वपक्षीय सरसावले

लातूर शहराला नेमका कुठून पाणीपुरवठा करणार हे प्रशासन निश्चित सांगायला तयार नाही. या पाश्र्वभूमीवर लातूरकर पाणीप्रश्नी चांगलेच हवालदिल झाले असताना विविध राजकीय पक्षांसह अनेकांनी आता या बाबत रस्त्यावरून उतरून संघर्ष करण्याचा इशारा दिला.

लातूरकर दिनकर पाटील यांचा तरुणांसमोर वेगळा आदर्श

‘मधु मागसी माझ्या सख्यापरी! मधुघटची रिकामे पडती जरी!’ या काव्यपंक्ती अनेकांना माहिती आहेत.

सुनील देवरे यांच्या शिल्पकृतींचे आबुधाबीत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

शिव-पार्वतीच्या सुंदर शिल्पात ऊस काढलेला असेल तर अर्थ काय घ्यायचा? त्यांच्या आयुष्यातला गोडवा शिल्पकाराला सांगायचा असतो. अभिव्यक्ती प्रतिकांच्या रुपाने उभी ठाकते, तेव्हा त्यास नव्या जाणिवा मिळतात.

मालमोटारीची अॅपेरिक्षाला धडक; ४ ठार, ९ जखमी

कार्तिक पौर्णिमेनिमित्त कपीलधार येथे मन्मथ स्वामी यांच्या समाधी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या अॅपेरिक्षाला समोरून येणाऱ्या मालमोटारीने धडक दिल्याने रिक्षातील ४ भाविक ठार, तर नऊजण गंभीर जखमी झाले.

उद्धव ठाकरे रविवारी परभणीत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (दि. २९) जिल्हा दौऱ्यावर येत असून दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत शिवसेनेच्या वतीने देण्यात येणार आहे.

‘स्पर्धा परीक्षा उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक’

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा ३३ वरून ४०, तसेच पोलीस उपनिरीक्षक पदाची वयोमर्यादा २८ वरून ३३ करण्याच्या मागणीबाबत डिसेंबरात सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मराठवाडय़ात अवकाळीचा कहर

गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी मराठवाडय़ात बहुतेक ठिकाणी पावसाने अवकाळी बरसात केली.

पात्रताधारकांच्या पदोन्नत्यांचा मार्ग आता मोकळा?

पदोन्नत्यांचा प्रदीर्घ काळ रखडलेला विषय लवकर मार्गी लागून पात्रताधारकांना युती सरकारकडून दिवाळी भेट मिळेल, या मनोभूमिकेत महसूल विभाग आहे.

शिक्षण विभागाचा कारभार गतिमान करण्यासाठी पाच व्हॉट्सअॅप समूह

शिक्षण विभागाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानातील पुढचे पाऊल असलेले व्हॉट्सअॅपचे प्रत्येक जिल्ह्यात पाच समूह तयार करून शासकीय आदेशाची देवाण-घेवाण करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांनी केल्या आहेत.

Just Now!
X